-
. ‘उतरन’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली टप्पू म्हणजेच अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकत्यात शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे टीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
टीना दत्ता सोशल मीडियावर अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. मालिकेमध्ये सोज्वळ मुलीची भूमिका साकारणाऱ्या टीनाच्या बोल्ड लूकवर चाहते घायाळ होतात.
-
टीनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. टीनाने काही टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीनाचे हे फोटो सोशल मीडियवर वेगाने व्हायरल होतं आहेत.
-
या फोटोंमध्ये टीना दत्ताने फक्त मल्टीकलर बिकिनी परिधान केल्याचं दिसतंय. तर मोकळ्या पाठीवर तिचे केस विखुरलेले आहेत.
-
या बोल्ड फोटोला टीनाने तितकच हटके कॅप्शन दिलंय. “हरकत नसेल तर तापमान वाढवू?” असं ती म्हणालीय. “मला वाटलं नवीन महिनात थोडा बदल हवा” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.
-
हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मात्र टीनाने एक काळजी घेतली आहे. टीनाने तिचं कमेंट सेक्शन बंद केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना टीनाच्या फोटोवर कमेंट करण्याचा मार्ग बंद झाला आहे.
-
‘उतरन’ नंतर टीना ‘कोई आने को है’, ‘कर्मफल दता शनी’ या मालिकांमधून झळकली होती. (all photo-instagram@tinadatta)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल