-
फिल्म मेकर मणी रत्नम यांनी आजवर अनेक हिंदी आणि तेलगू सिनेमा केले आहेत. त्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. मणी रत्नम यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. मणी रत्नम यांच्या सिनेमाची कथा , कथेची गुंफण, कथेला साजेसं संगीत हे सारं काही त्यांच्या सिनेमाची खासियत आहे. मणी रत्नम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या अशा काही सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत एकदा तर नक्की पहावे.
-
मोउना रागम: सिनेसृष्टीतील योगदानामुळे मणी रत्नम यांना आजवर ६ राष्ट्रीय पुरस्कार प्रात्प झाले आहेत. १९८६ साली आलेल्या मोउना रागम (Mouna Ragam) या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर मणी रत्नम यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (photo-indian express Archive)
-
थलापति : १९९१ सालात आलेल्या थलापति हा तामिळ सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. सुपरस्टार रजनीकांतं आणि मामूट्टी यांची सिनेमातील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.(photo-indian express Archive)
-
अंजली: १९९० सालात आलेला अंजली सिनेमा अनेकांच्या काळजाला भिडला. ९० च्या दशकातील हा एक सर्वोत्तम बालपट होता. या सिनेमाला एकूण ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. (photo-Youtube)
-
रोजा: दहशतवाद आणि राजकारण यात गुरफटलेली एक लव्ह स्टोरी म्हणजे रोजा. अरविंद स्वामी आणि मधू या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनय शैलीने या सिनेमात जीव ओतला आहे. या सिनेमातील एआर रेहमानच्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
-
रोजा: दहशतवाद आणि राजकारण यात गुरफटलेली एक लव्ह स्टोरी म्हणजे रोजा. अरविंद स्वामी आणि मधू या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनय शैलीने या सिनेमात जीव ओतला आहे. या सिनेमातील एआर रेहमानच्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. .(photo-indian express Archive)
-
दिल से : १९९८ सालामध्ये आलेल्या या सिनेमतून शाहरूख खान आणि मनीषा कोइराला झळकले होते. या सिनेमातूनच अभिनेत्री प्रिती झिन्टाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील एईर रेहमानच्या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.
-
युवा: तर २०१० सालात आलेल्या युवा सिनेमाला देखील तरुण वर्गाची मोठी पसंती मिळाली होती.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल