-
दत्ता… एक गुढ व्यक्तिरेखा. सध्या चालू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील मध्यवर्ती पात्रांमधील एक. गुंतागुंतीची व्यक्तिरेखा. या मालिकेतील दत्ताचं खरं नाव सुहास शिरसाट असून त्याने ज्या कुशलतेने ही व्यक्तिरेखा उभी केली आहे त्याचं कौतुक वाटतं. गेली कित्येक वर्ष त्याच्या या भूमिकेबद्दल प्रेक्षकांना सदैव कौतुक वाटत आलं आहे.
-
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील दत्ताच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबाबत खूप कमी लोकांना माहितेय. दत्ताची भूमिका करणारा सुहास शिरसाट एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती आहे. त्याच्या पत्नीचं नाव स्नेहा माजगांवकर असून ती दिसायला अतिशय सुंदर आहे. स्नेहा देखील एक अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय.
-
नुकतंच झी युवाच्या 'कट्टी बट्टी' या मालिकेत झळकली होती. त्यानंतर ती 'माझे पती सौभाग्यवती' मालिकेत तिने काम केलं असून तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतूक केलं. 'तुझा धर्म कोणचा?', “ह्या साल्या एनर्जीचं करायचं काय?” या नाटकात देखील तिने काम केलं आहे.
-
अभिनेता सुहास शिरसाट मुळचा बीडला असून तो आणि त्याची पत्नी स्नेहा माजगांवकर दोघेही मुंबईत राहतात.
-
दोघांनीही त्यांच्या कामाला त्यांच्या खाजगी आयुष्यात कधीच येऊ दिलं नाही. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या 'सेक्सी टाइम' या वेब सीरीजमध्ये सुहास शिरसाट आणि त्याची पत्नी स्नेहा माजगांवकर दोघे पहिल्यांदा एकत्र दिसून आले. यात दोघांनी एका मध्यमवयीन विवाहित जोडप्यांच्या भूमिका साकारली आहे.
-
सुहास शिरसाटची पत्नी स्नेहा माजगांवकर ही तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमीच पती सुहाससोबतचे फोटोज शेअर करत असते.
-
स्नेहा माजगांवकर ही मुळची सातारची आहे. दोघांच्या लग्नानंतर लगेचच शूटिंग सुरू झाल्यामुळे त्यांना त्यांचा मधूचंद्र साजरा करता आला नाही. म्हणून दोघांनीही सहा दिवसांची सुट्टी काढून महाबळेश्वरला त्यांचा मधूचंद्र साजरा केला होता.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…