-
माडेल आणि अभिनेत्री जिया खानचा आज आठवा स्मृती दिन आहे. जिया खानने तिच्या अगदी कमी काळाच्या करिअरमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. 3 जून २०१३ साली जियाने तिच्या जूहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली.
-
जिया खानच्या आत्महत्येनंतर देखील बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघालं होतं. जिया खानचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. सात वर्षानंतरही जिया खानच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं नाही
-
जिया खान अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीला डेट करत होती. त्यामुळे जियाच्या आत्महत्येप्रकरणी त्याचं नावही पुढे आलं होतं.
-
मात्र जियाच्या आत्महत्येपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती कालांतराने समोर आली. जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीला काही दिवसांसाठी कारावास भोगावा लागला होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तर जिया खानची केस अद्याप न्यायालयात सुरू आहे.
-
फेसबुकवर जिया आणि सुरजची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. जियाला काम मिळणं बंद झाल्याने ती नैराश्यात गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
जिया खानच्या आत्महत्येनंतर घरात सहा पानी पत्र मिळालं होतं. या पत्राचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यात तिने सुरजवर तिचं खूप प्रेम होतं मात्र त्याबदल्यात तिला फक्त शिवीगाळ ऐकावी लागली आणि हिंसाचार सहन करावा लागल्याचं म्हंटंल होतं.
-
. २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यूयॉर्कमध्ये जिया खानचा जन्म झाला होता.जियाचं मूळ नाव नफीसा रिझवी खान होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने आपलं नाव बदललं.
-
जिया खान जॅज, सालसा, साम्बा, कथक आणि बेली डान्समध्ये पारांगत होती.
-
२००७ मध्ये जिया खानने राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. 'निशब्द' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती. पहिल्याच चित्रपटात सुपरस्टार अमिताभसोबत काम केल्यामुळे जियासाठी हा चित्रपट खास होता.
-
पहिल्याच चित्रपटातील जियाच्या अभिनायची जोरगार चर्चा झाली होती. फिल्मफेअरमध्ये जियाला बेस्ट डेब्यू फिल्मसाठी नॉमिनेट केलं होतं.
-
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर जिया खानने अमिर खानसोबत गजनी चित्रपटात काम केलं. (all flie photos)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम