-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ४ जून रोजी लग्न बंधनात अडकली आहे.
-
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिने लग्न केले.
-
तिने दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले आहे.
-
पण आदित्य धर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
यामी आणि आदित्यने २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.
-
आदित्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
-
आदित्यला उरी चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
-
लवकरच त्याचा 'The Immortal Ashwatthama' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
यामी आणि आदित्य यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे,
-
सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन, वाणी कपूर, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, ताहिरा कश्यप अशा अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…