-
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ४ जूनला विवाहबंधनात अडकली. 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत यामीने लग्नगाठ बांधली.(photo-instagram@yamigautam)
-
सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत यामीने लग्न केल्याची माहिती दिली. हा फोटो यामीच्या लग्नसोहळ्यातील असून यात यामी लाल रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसतेय. (photo-instagram)
-
. तसचं यामीने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदी सोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत. .(photo-instagram@yamigautam)
-
मेहंदी सोहळ्यासाठी यामीने खास केशरी रंगाचा ड्रेस परिधान केलाय. या ड्रेलसा साजेसे असे सुंदर कानातले तिने घातले आहेत. तर मेहंदी काढणाऱ्या यामीकडे आदित्य नजरेत नजर मिळवत पाहतोय. ..(photo-instagram@yamigautam)
-
या फोटोत यामी आणि आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय…(photo-instagram@yamigautam)
-
अगदी संपूर्ण हातभर मेहंदी न काढता यामीने अगदी लहान आणि नाजूक मेहंदी काढण्यास पसंती दिलीय..(photo-instagram@yamigautam)
-
यामीच्या लग्नाचा फोट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर आता यामी आणि आदित्यच्या लग्नसोहळ्यातील इनसाइड फोटो समोर आले असून हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. .(photo-instagram)
-
तर व्हायरल झालेल्या यामी गौतमीच्या लग्न सोहळ्यातील फोटोतही तिचा सुंदर अंदाज पाहायला मिळतोय. यात यामीने लाल रंगाची सुंदर साडी परिधान केलीय. त्यावर मोठी बिंदी, नाकात नथ आणि गळ्यात हार असे अलंकार घातले आहेत. तर आदित्यने देखील पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केलीय. आणि डोक्यावर पांढरा फेटा बांधला आहे.(photo-instagram)
-
यामीच्या लग्नसोहळ्याला फक्त १८ पाहुणे उपस्थित होते. करोनाची स्थिती लक्षात घेत अगदी मोजक्या पाहुण्यांना निमंत्रीत करण्यात आलं होतं. .(photo-instagram)
-
यामी आणि आदित्य बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघेही आता विवाहबंधनात अडकले आहेत. (photo-instagram@yamigautam)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी