-
5G नेटवर्कला विरोध करणारी एक याचिका अभिनेत्री जूही चावलाने दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. 5G नेटवर्कच्या विकिरणांमुळे मानवी जीवनावर तसंच पशु-पक्षी आणि पर्यावरणाला कायम स्वरुपी नुकसान होवू शकतं असा दावा करत जूहीने ही दूरसंचार कंपन्यांविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र दिल्ली हायकोर्टाने जूही चावलाची ही याचिका फेटाळली आहे. ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणजेच केवळ प्रसिद्धीसाठी जूहीने हे पाऊल उचलल्याचं म्हणत हायकोर्टाने जूही चावलासह दोघांना २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
-
हायकोर्टाने जूहीला फटकारल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मात्र लगेचच चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांनी जूहीला लक्ष केलं. जूहीचे भन्नाट मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले.
-
एका युजरने जूहीचा एका जुन्या सिनेमाच्या गाण्यातील फोटो शेअर केलाय. यात जूही डोळी फिरवताना दिसतेय. "5G नेटवर्कच्या रेडिएशनमुळे जूहीची अवस्था" असं त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.
-
प्रसिद्धीच्या मोहापोटी जूहीला कोर्टाने २० लाखांचा दंड ठोकावल्यामुळे नेटकऱ्यांनी जूहीला चांगलंच ट्रोल केलं आहे.
-
एका युजरने 'इश्क' सिनेमातील जूही आणि आमिर खानच्या एका विनोदी सीनचा फोटो शेअर केला आहे. यात तो म्हणाला, "फेकन्यूज मुळे फसण्याची जूहीची ही काही पहिली वेळ नाही."
-
तर जूहीच्या 'वो मेरी निंद मेरा चैन मुझे लोटा दो' या गाण्यातील एक फोटो शेअर करत. जेव्हा कोर्टाने जूहीची याचिका फेटाळली तेव्हा जूहीची अवस्था असं एक नेटकरी म्हणालाय.
-
जूहीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने एका युजरने जूहीचा दु:खी फोटो शेअर केलाय. यात तो म्हणाला, "खाया पिया कुछ नही बिल भरा २० लाख"
-
जूही चावलासाठी आणखी एक भन्नाट मीम
-
कोर्टाने फटकारल्यानंतर जूहीची अशी अवस्था झाली असेल असं या मीममधून दाखवण्यात आलंय.
-
तर कोर्टाच्या निर्णयानंतर जूहीची प्रतिक्रिया काहीशी अशी असले असं म्हणत नेटकऱ्याने जूहीवर निशाणा साधला आहे.
-
'हे तर होणारच होतं' असं म्हणत एका नेटकऱ्याने जूहीला ट्रोल केलंय.
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम