-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणजे नेहा कक्कर.
-
आज ६ जून रोजी नेहाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी..
-
नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते.
-
गेल्या वर्षी नेहाने ऋषिकेशमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केल्याचे सांगितले होते.
-
या बंगल्यात स्विमिंग पूल आहे.
-
तिने भावासाठी क्रिकेट मैदान देखील तयार केले आहे.
-
तिने नव्या बंगल्याचा फोटो शेअर करत तेथील तिच्या जुन्या घराचा देखील फोटो दाखवला होता.
-
ऋषिकेशमधील या जुन्या घरात नेहाचा जन्म झाला.
-
या घरात तिचे संपूर्ण कुटुंब एका खोलीत राहात होते.
-
घरातील एका खोलीमध्ये टेबल मांडून तिची आई तेथे जेवण बनवत असे.
-
ही टेबल मांडलेली खोली नेहाच्या कुटुंबीयांनी भाड्याने घेतली होती.
-
आता याच शहरामध्ये नेहाने एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.
-
नेहा आता बऱ्याच वेळा ऋषिकेशमधील बंगल्यातील फोटो शेअर करताना दिसते.
-
ती पती रोहनप्रीत सिंहसोबत बऱ्याच वेळा तेथील फोटो शेअर करत असते.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…