-
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम लोकप्रिय अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल या दोघांमधील वाद आता जगजाहीर झालाय. अभिनेता करण मेहरा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करणने आतापर्यंत अत्यंत कठिण परिस्थितीतून लोकप्रिय अभिनेतापर्यंतचा प्रवास केलाय. जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी….. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकामधून करण एक लोकप्रिय अभिनेता बनला असला तरी त्याचं मन सुरवातीपासून फॅशन डिझायनिंग क्षेत्राकडेच वळत होतं. करणने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं होतं. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं.
-
करण हा फक्त क्रिएटीव्ह पर्सनच नाही तर तो एक उद्योजक सुद्धा आहे. 'रूट्स अॅण्ड विंग्स' या टी-शर्ट ब्रॅण्डच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. इतकंच नाही तर 'वो (लो) कल' या कंपनीचा सहसंस्थापक देखील आहे. एका वेबसाईटनुसार 'वो (लो) कल' ही कंपनी एक हाइपर लोकल डिस्कवरी आणि इन्फ्लुएन्सरवर आधारित तयार केलेला एक डिजीटल प्लॅटफॉर्म आहे.
-
'ये रिश्ता क्या कलहाता है' मालिकेनंतर करणचा पहिला चित्रपट 'लव स्टोरी 2050' रिलीज झाला. पण लोकांनी या चित्रपटाला काही खास प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तो काही निवडक चित्रपटांमध्येच दिसून आला. तरीही त्याला टीव्ही अभिनेताच म्हणून प्रेक्षक ओळखतात.
-
काही लोकांना बाहेर लॉंग ट्रीपला न जाता फक्त त्यांच्याच घरी वेळ घालवायला जास्त आवडतं. पण करण मेहरा यातला नाही. त्याला वेगवेगळी ठिकाणं पहायला आणि दूर दूरचा प्रवास करायला खूप आवडतं. अभिनय क्षेत्रातील त्याच्या करियरमुळे त्याला प्रवास करण्याचा छंद जोपासता येत होता.
-
मूक प्राण्यांना स्पर्शाची प्रेमळ भाषा कळते. मालकाने जितकं प्रेम दिलं त्यापेक्षा कितीतरी दुप्पटपटीने ते मालकावर प्रेम करतात. करण हा एक 'डॉग पर्सन' आहे आणि त्याचं त्याच्या कुत्र्यावर खूप प्रेम आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याने एक कुत्रा पाळलाय. त्याच्या कुत्र्याने एका १६ वर्षाच्या कुत्र्याला जन्म दिला आणि गेल्या एप्रिल महिन्यात त्याचा मृत्यू झाला.
-
आपल्याकडे एकच पृथ्वी आहे आणि त्यामूळे संसाधनांच्या वापरावर मर्यादा घालणे आणि या मर्यादांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. करणला सुद्धा पृथ्वीवरील संसाधनांचं जतन करणं आवडतं आणि यासाठी तो त्याच्या सोशल मीडियाचा वापर देखील करताना दिसून आला. तो ग्रहांचं अस्तित्व टिकून रहावं यासाठी कायम विविध प्रयत्न करताना दिसून येतो.
-
करणला वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड असून तो एक 'फुडी पर्सन' आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हायलाइट्समध्ये वेगवेगळ्या डिशेसच्या स्टोरीज शेअर केलेल्या आहेत.
-
एका अभिनेत्याच्या करियसरसाठी त्याची फॅन फॉलोइंग महत्त्वाची गोष्ट आहे. करणला हे आधीच कळलं होतं. म्हणूनच तो त्याच्या फॅन्ससोबत वेळ घालवताना दिसून येत असतो. तो त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्ससोबत जोडलेला राहतो. सध्या त्याच्यावर कठिण परिस्थिती उद्भवली आहे, अशा कठिण काळात त्याचे फॅन्स त्याला साथ देताना दिसून येत आहेत.
-
करण आणि निशाची पहिली भेट २००८ मध्ये 'हसते हसते' या चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. या चित्रपटात करण एक स्टायलिश म्हणून काम करत होता. निशाला बघताच क्षणी करण तिच्या प्रेमात पडला. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्या दोघांना एक मुलगा असून कविश असं त्याचं नाव आहे.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…