-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमधील भिडे मास्तरांची मुलगी सोनू म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशाली गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. 'तारक मेहता..' मधील टप्पूची खास मैत्रीण सोनाली भिडे म्हणजेच निधीचा बोल्ड अदांची सध्या नेटऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे.
-
निधी सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकताच निधीचा बिकिनीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आणखी एक बोल्ड फोटो शेअर करत निधीने नेटकऱ्यांना घायाळ केलंय.
-
निधीने शेअर केलेल्या फोटोत ती आपल्या श्वानासोबत निवांत वेळ घालवताना दिसतेय. या फोटोत निधी तिचे पाय फ्लॉन्ट करताना दिसतेय.
-
निधी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळताना दिसते.
-
निधीने तिचा मेकओव्हर केलाय़. त्यामुळे 'तारक मेहता..'मधील सोनू आणि आणि आताची निधी यात खूप मोठा फरक जाणवतो.
-
निधीने ड्रेडलॉक्स हेअर स्टाइल केली असून या हेअर स्टाइलमधील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या हेअर स्टाइलमध्ये संपूर्ण केस कुरळे केले जातात.
-
ड्रेडलॉक्स हेअर स्टाइलसोबतच नाकातील तिच्या नथीच्या स्टाइलने तिचा लूक आणखीनच उठून दिसतोय.
-
निधी वेगवेगळे लूक्सला पसंती देताना दिसते. काही दिवसांपूर्वी निधीने शॉर्ट हेअरकट केला होता. या लूकमधील तिच्या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.
-
निधीला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडतो. जंगलात फिरताना किंवा पोहतानाचे अनेक फोटो निधीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात. याआधी देखील निधीने तिचे बिकिनीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये निधीने जवळपास ६ वर्ष सोनूची म्हणजेच भिडे मास्तरांच्या मुलीची भूमिका साकारली होती. (All photo- _ninosaur)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी