-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधीत अंमली पदार्थ प्रकरणाचा तपास NCB करत आहे. आता या प्रकरणात रिया चक्रवर्तीनं एनसीबीला दिलेली स्टेटमेंट्स समोर आली आहेत आणि यात तिने अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा उल्लेख केलाय. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खान पहिल्यांदाच स्पॉट झाली आहे.
-
आजपासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये मुंबईत जीमसाठी परवानगी देण्यात आली. ही बातमी कळल्यानंतर बॉलिवूडकरांनी सकाळीच जीम गाठली. यात अभिनेत्री सारा अली खानने सुद्धा तिचा वर्कआऊट मोड ऑन केला आणि सकाळी सकाळीच जीम गाठली.
-
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अनेक खुलासे केले आहेत. यात सारा अली खानने तिला गांजा आणि व्होडकाची ऑफर दिली होती, असं सांगितलं. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात सारा अली खान अडकताना दिसून येतेय.
-
त्यानंतर आज तिला मुंबईतल्या जीममधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आलंय. जीम बाहेर स्पॉट केल्यानंतर माध्यमकर्मींसमोर ती आपल्या चेहऱ्यावर स्माईल देताना दिसून आली. त्यामूळे सुशांत सिंह राजपूतच्या निधनाशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात अडकण्याबाबत कोणतीही भिती तिच्या चेहऱ्यावर दिसून आलेली नाही.
-
जीममधून बाहेर पडताना स्पॉट झाल्यानंतर सारा अली खान फोटोग्राफर्ससमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसून आली. वर्कआऊट सेशन केल्यानंतर तिच्या गाडीत बसण्यासाठी जात होती. यावेळी ती व्हाईट टॉप आणि परपल शॉर्ट्समध्ये दिसून आली. (Photo: Varinder Chawla)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…