-
अॅमेझॉन प्राइमवर नुकत्याच रिलीज झालेल्या 'द फॅमिली मॅन-२' या वेब सीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. या वेब सीरिजमधील प्रत्येक दमदार भूमिकेने या सीरिजमध्ये जीव ओतला आहे. वेब सीरिजमध्ये असलेली भास्करन ही महत्वाची व्यक्तीरेखा काल्पनिक असल्याचं निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आलं असलं. तरी ही व्यक्तीरेखा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या श्रीलंकेतील संघटनेचा संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरन यांच्याशी प्रेरित आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जगातील सर्वात गतिमान गनिमी सैनिकांपैकी एक म्हणून प्रभारकन ओळखला जातो. कोण आहे प्रभाकरन हे आज आपण जाणून घेणार आहोत.(photo-indian express archive)
-
श्रीलंकेच्या राजकारणात प्रभाकरणच्या नावाचा उल्लेख प्रकर्षाने जाणावतो. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना प्रभाकरनने केली. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वे भागात स्वतंत्र तामिळ राज्य निर्माण करणं हे त्याचं उद्दीष्ट होतं. LTTE एलटीटीई या संघटनेनं 25 वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेच्या सैनाशी सशस्त्र लढा दिला. 'द फॅमिली मॅन-२' मधील भास्करनचं उदिष्ट्य देखील सारखंच दाखवण्यात आलंय..(photo-indian express archive)
-
प्रभाकरनचा जन्म श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्यालगत असलेल्या वाल्वेथीथुरै इथं झालं. तो चार भावंडापैरी सर्वात लहान होता. (photo-indian express archive)
-
एलटीटीईला श्रीलंकेच्या तामिळ लोकांसाठी स्वायत्तता हवी होती.श्रीलंका सरकार देशातील तमिळ लोकांवर भेदभाव करत असल्याचा आरोप प्रभाकरन आणि त्याच्या संघटनेने कायम केला. (photo-indian express archive)
-
1976 साली प्रभाकरनने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या संघटनेची स्थापना केली. ही एक सशस्त्र आणि युद्धनीतीत तरबेज अशा सैनिकांची संघटना होती. (photo- AP)
-
1983 साली एलटीटीई संघटनेने जाफाना इथं श्रीलेंकेच्या तळावर हल्ला केला. यात १३ सैनिक गतप्राण झाले. या हल्ल्यानंतर मात्र एक भीषण हत्याकांड घडलं ज्यात शंभरहून अधिक तामिळ नागरिकांनी जीव गमवावा लागला होता. श्रीलंकेमधील सिव्हल वॉरची ही सुरुवात होती. 2006 मध्ये श्रीलंकेच्या सैन्याने एलटीटीईला पराभूत करण्यासाठी कारवाई सुरू केली. (photo-indian express archive)
-
2006 सालामध्ये श्रीलंकेच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात एलटीटीई प्रमुख प्रभाकरनचा मृत्यू झाला होता. श्रीलंका सैनाच्या हातूनच प्रभाकरनचा मुलागा चार्ल्स अँथनी याचा मृत्यू झाला. 'फॅमिली मॅन-२' मध्ये महत्वाचं पात्र असलेल्या भास्करनची भूमिका प्रभाकरनशी प्रेरित असल्याच्या चर्चा आहेत. (photo-Reuters)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…