-
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड अंदाजासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा पटानीचा आज तिचा 29वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी दिशा वाढ दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.याच निमित्ताने आपण दिशाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
दिशा पटानीचा जन्म उत्तराखंडमधील पिथोरागढमध्ये झालाय. त्यानंतर तिचं कुटुंब बरेलीमध्ये स्थायिक झालं. दिशा पटानीचे वडील पोलीस खात्यात डीएसपी आहेत. दिशाला एक मोठी बहीण असून तिचं नाव खुशबू पटानी असं आहे.
-
दिशा पटानीने नोएडा इथल्या एमिटी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय.
-
दिशाने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली. २०१३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. यात ती पहिली रनरअप ठरली. त्यानंतर कॅडबरी डेरी मिल्कच्या एका जाहिरातीमुळे दिशाला मोठी लोकप्रियता मिळाली.
-
२०१५ सालापासून दिशाच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. 'लोफर' या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या सिनेमात दिशाने एका हैदराबादी तरुणीचा भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमामुळे दिशाला म्हणावी तितकी लोकप्रियता मिळाली नाही.
-
त्यानंतर २०१६ मध्ये मात्र दिशाला एक मोठी संधी मिळाली. भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची बायोपिक असलेल्या 'धोनी- एन अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात दिशाला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात दिशाने महेंद्र सिंह धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. सुशांत सिंह राजपूतनसोबत ती या सिनेमात झळकली.
-
दिशा पटानीला धोनी- एन अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातील भूमिकेसाठी बेस्ट डेब्यू अवार्ड मिळाला होता.
-
सध्या दिक्षाचं मुंबईमध्ये आलिशान घरं आहे. 2017 सालात दिशाने वांद्रे इथं एक फ्लॅट खरेदी केला असून या घराची किंमत तब्बल ५ कोटी रुपये आहे. दिशाच्या घराचं नाव 'लिटिल हट' असं आहे.
-
9सिनेमांसोबत दिशा तिच्या अफेअरमुळे कायम चर्चेत राहिली. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता पार्थ समथानला दिशआ डेट करत होती. मॉडेलिंग करत असताना जवळपास १ वर्ष दिशा आणि पार्थ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर मात्र दोघांचं ब्रेकअप झालं.
-
त्यानंतर दिशा आणि टायगरची मैत्री झाली आणि ते एमेमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. दिशा आणि टायगरला अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. माक्ष अजूनही त्यांनी त्यांच्या अफेअरची कबुली दिलेली नाही.
-
दिशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
लवकरच दिशा 'व्हिलन-२' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (All photo- instagram@dishapatani)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश