-
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी १४ तारखेला सुशांतने अचानक या जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनामुळे उत्कृष्ट अभिनेता बॉलिवूडने गमावला आहे. टेलिव्हिजन मालिकेपासून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये त्याचं स्थान निर्माण केलं होतं. 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र 'पवित्र रिश्ता' या त्याच्या दुसऱ्या मालिकमुळे सुशांतच्या करिअरला खरी सुरुवात झाली. मानव या त्याच्य भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
-
'काय पो छे' सिनेमातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. 2013 सालाममध्ये आलेल्या 'काय पो चे' या पहिल्याच सिनेमातून सुशांतने चाहत्यांची मनं जिकली. या सिनेमात त्याने खेळातमध्ये रस असलेल्या इशान नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी सुशांतला फिल्मफेयर बेस्ट डेब्यूसाठी नामांकन मिळालं होतं. त्यानंतर सुशांत पीके, शुद्ध देसी रोमांस या सिनेमांमध्ये झळकला.
-
शुद्ध देली रोमांस- २०१३ सालातच आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' या सिनेमात सुशांतचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाला. या सिनेमातील सुशांतच्या रघू या भूमिकेला खास करून तरुणींनी मोठी पसंती दिली.
-
पीके : आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात सुशांत सिंह राजपूतची भूमिका लक्षवेधी ठरली. या सिनेमात सुशांतने सरफाराज ही भूमिका साकारली होती. या सिनेमातील मुख्य अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजेच सिनेमातील जग्गूच्या प्रेमात पडलेल्या सरफराजचे चाहत्यांची मनं जिकंली.
-
सोनचिडिया: अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचं जीवन तिथली परिस्थिती रेखाटण्यात आली होती. या सिनेमात सुशांतने लखना ही भूमिका साकारली होती. हा सिनेमा हिट ठरला नसला तरी सिनेमातील सुशांतची भूमिका चांगलीच गाजली होती.
-
एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी : २०१६ सालामध्ये आलेला हा सिनेमा सुशांत सिंह राजपूतच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. भारतीय संघाचा माजी कप्तान महेंद्र सिंह धोनीची बायोपिक असलेल्या या सिनेमात सुशांतने साकारलेली धोनीची भूमिका देशासह जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. सुशांतने त्याच्या भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. या भूमिकेसाठी सुशांतला फिल्मफेयरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
-
केदारनाथ: २०१८ सालामध्ये आलेल्या या सिनेमात केदारनाथमध्ये आलेल्या महा प्रलयाच्या पार्श्वभूमीवर बरहलेली प्रेमकथा रंगवण्यात आलीय. या सिनेमात सुशांतने केदारनाथला येणाऱ्या भाविकांची सेवा करणाऱ्या मंसूर या मुस्लिम तरुणाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील सुशांतच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.
-
छिछोरे: २०१९ सालामध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सुशातंचा ‘छिछोरे’ हा शेवटचा सिनेमा होता.या सिनेमात अपयशाने खचून आत्महत्या करण्याऱ्या मुलांना अपयशाने खचून न जाता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसे बघायचे हे सुशांतने सांगितले होते. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शानानंतर काही दिवसातच सुशांतने आत्महत्या केली. या सिनेमाने अवघ्या काही दिवसातंच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.
-
दिल बेचारा: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रदर्शित झालेला 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. सकारात्मकता पसरवणाऱ्या मॅनी या तरुणाची भूमिका त्याने या सिनेमात साकारली होती. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट सुशांतच्या आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरला. मात्र हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर कोरला जावा असा अभिनय सुशांतने यात केल्याचं पाहायला मिळालं. (all Photo-indian express archive)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी