-
सशुांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी आहे. सुशांतचं जाणं हे म्हणजे एक मोठा धक्का होता. त्याचं कुटुंब आणि मित्र परिवार सुशांतच्या जाण्याने हादरून गेलं. चेहऱ्यावर कायम हास्य आणि आनंदी दिसणाऱ्या सुशांतचा स्वभाव अगदी शालेय जीवनापासून असाच उत्साही आहे. त्याच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण त्याचे काही न पाहिलेले शाळा आणि महाविद्यालयीन जीवनातले फोटो पाहणार आहोत.
-
सुशांत सिंह राजपूतच्या सोशल मीडियावरील हा एक जुना फोटो आहे. यात सुशांतने त्याची पहिली बाईक घेतल्यानंतरचा आनंद व्यक्त केलाय. यात त्याने लिहलं आहे. "कॉलेड डेज. इंजीनियरिंगच्या मुलांना शिकवणी देऊन मिळवलेल्या पैशातून घेतलेली माझी पहिली बाईक. काही गोष्टी तुम्हाला खूप आनंद देऊन जातात. (Photo: Sushant Singh Rajput/Facebook)
-
कॉलेजमधील सुशांतचा मित्र वरुण कुमारने त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील काही फोटो शेअर केले आहेत. "सुशांत आणि मी कॉलेजमधील मित्र आहोत. आम्ही दिल्लीमध्ये खूप काळ एकत्र राहिलो. खूप मजा केली. खूप स्वप्न पाहिली. ती स्वप्न पूर्णकरण्यासाठीच तो मुंबईत गेला आणि मी अमेरिकेत. त्याच्या स्वप्नांच्या यादीत मला भेटण्याची इच्छा देखील त्याने लिहली होती. मलाही त्याला भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा होता. वयाच्या ३४ व्या वर्षीच तो माझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल असा विचारही कधी केला नव्हता. आमची मैत्री आणि तो गेल्यानंतर होत असलेल्या वेदनांचं वर्णन करणं अशक्य आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वरुणने हे फोटो शेअर केले आहेत. (Photo: varundce87/Instagram)
-
वरुणने आणखी एक जुना फोटो शेअर केलाय ज्यात सुशांतला ओळखण कठीण आहे. (Photo: varundce87/Instagram)
-
तर एका फोटोच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहलं आहे, "माझा एकमेव मित्र"
-
तर वरुणने मनालीमधील काही फोटो शेअर केले होते. यात तो म्हणाला, "आम्ही नदीकाठी बसलो होतो. तो एकाग्रतेने खळखळणाऱ्या पाण्याकडे पाहत होता. मला माहितेय तो जिथे गेला असले तिथे अशीच उर्जा घेऊन गेला असेल. (Photo: varundce87/Instagram)
-
सुशांतसिंग राजपूतची आणखी एक मैत्रीण आरती बत्रा दुआने सुशांतच्या आठवणीत फोटो शेअर केले आहेत. गेल्या वर्षी हा फोटो शेअर करत तिने एक पोस्ट लिहली होती. "खेळकर स्वभावाचा, सर्वांना हसवणाऱा सुशांत आता राहिला नाही. सुशांत खूप जवळचा मित्र होता. अकरावीत आम्ही पहिल्यांदा भेटलो." हा पोस्टमध्ये आरतीने देखील सुशांतच्या आनंद पसरवणाऱ्या स्वभावाबद्दल लिहिलं आहे. (Photo: Arti Batra Dua/Instagram)
-
आरतीने सुशांत आणि त्यांच्या काही मित्रांचे फोटो शेअर केले आहेत.
-
अतुल मिश्रा या सुशांतच्या वर्ग मित्राने देखील गेल्यावर्षी सुशांतच्या आठवणीत एक फोटो शेअर केला होता. "माझा मित्र सुशांतसाठी, तू जिथे कुठे असशील तिथे आनंदात असशील अशी आशा करतो. तू कायम आठवणीत राहशील"(Photo: Atul Mishra/Facebook)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO