-
१३ जूनला अभिनेत्री दिशा पटानीने तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. वाढदिवसा निमित्ताने दिशाला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दिशा पटानीने तिचा वाढदिवस तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तींसोबत सेलिब्रिट केला आहे. दिशाचा कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण आणि दिशाची खास मैत्रिण कृष्णा श्रॉफसोबत धमाल करत दिशाने तिचा वाढ दिवस साजरा केला. दिशाने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
तर दिशाच्या बर्थ डे साठी टायगर आणि कृष्णाने खास तयारी केल्याचं दिसून येतंय. या फोटोत फुग्यांची सजावट केल्याचं दिसून येतंय.
-
तर दिशासाठी खास केक आणल्याचं पाहायला मिळतंय. दिशाला अॅनिमेटेड सीरिजची आवड असल्याचं लक्षात येतंय.' नारुतो' या जपानी लोकप्रिय अॅनिमेटेड शोमधील नारुतो आणि त्याची पत्नी हिनाता ह्यूगा यांचं चित्र असलेला केक खास दिशासाठी सरप्राइज म्हणून आणला होता.
-
दिशाची मैत्रिण कृष्णा श्रॉफने देखील बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दिशाने शेअर केलेल्या फोटोत ती टायगर आणि कृष्णा श्रॉफसोबतच धमाल करताना दिसतेय.
-
दिशा आणि टायगर श्रॉफने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे कबुली दिली नसली तरी दिशा आणि टायगर अनेकदा सोबत वेळ घालवताना दिसून येतात. (all Photo- dishapatani)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी