-
अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. तर लिसाचा आज वाढदिवसदेखील आहे. नुकतेच लिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मैत्रिणींसोबत साजरा केलेल्या बेबी शॉवरचे म्हणजेच डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
लिसा हेडनने तिच्या मैत्रिणींसोबत या बेबी शॉवर पार्टीत चांगलीच धमाल केल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. तर या बेबी शॉवरसाठी अगदी खास तयार करण्यात आल्याचंही दिसून येतंय.
-
या बेबी शॉवर पार्टीसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. लिसासह तिच्या सर्व मैत्रिणींनी पांढऱ्या रंगाचे वेगवेगळ्या स्टाईलचे ड्रेस परिधान केले होते.
-
लिसाने पांढऱ्यारंगाचा फ्रिल असलेला शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर डोक्यावर तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांचा एक सुंदर बॅण्ड घातल्याचं दिसतंय. या ड्रेसमध्ये लिसा खूपच सुंदर दिसतेय.
-
हे फोटो शेअर करत लिसाने या सुंदर डेकोरेशनसाठी तिच्या मैत्रिणींचे आभार मानले आहेत. "सर्वात खास दिवसांपैकी एक…माझ्या बेबी शॉवरचं स्वप्न पूर्णत्वास आलं." असं म्हणत तिने मैत्रिणींचं कौतुक केलंय.
-
लिसाच्या बेबी शॉवरसाठी तिच्या मैत्रिणींनी खास फुलांची सजावट केली होती. संपूर्ण खोली गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवण्यात आली आहे. प्रत्येक टेबलावर फुलांचे आकर्षक पुष्पगुच्छ पाहिला मिळतायत.
-
तर एका फोटोत लिसा तिच्या मैत्रिणींसोबत टेबलावर बसल्याचं दिसतंय. यात तिच्या हाता वाईनचा ग्लास आहे. मात्र कॅप्शनमध्ये लिसाने तीने वाईनचं सेवन केलं नसल्याचं सांगितलंय. " हे फोटो काढत असताना मी वाईनचं सेवन केलेलं नाही." असं ती कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.
-
तर लिसाच्या या बेबी शॉवर पार्टीचा मेन्यू देखील खास दिसतोय. चॉकलेट केक आणि गुलाबी रंगाच्या मिरिंग्यू कूकीज पाहून तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल.
-
बेबी शॉवरसाठी खास केक.लिसा हेडनच्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत फोटोला पसंती दिली आहे
-
फ्रेंच मिरिंग्यू कॅण्डी.
-
लिसाने २०१६ साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होतं. २०१७ मध्ये तिने पहिल्या मुलाला म्हणजेच जॅकला जन्म दिला. तर २०२० मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. लिसाच्या दुसऱ्या मुलाचं नाव लिओ असं आहे.
-
लिसाने ‘आयेशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती वो ‘हाउसफुल 3’, ‘द शौकीन्स’, रास्कल्स, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सारख्या सिनेमांध्ये झळकली.(All Photos- instagram@ lisahaydon)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO