-
कलर्स मराठीवरील 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे.
-
अखेर मालिकेत शंतनू व शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे.
-
नुकताच घरच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अखेर हळदी समारंभदेखील मोठ्या आनंदात पार पडला आहे.
-
या मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना शंतनू – शर्वरीच्या हळदी सोहळ्याची धूम पाहायला मिळणार आहे.
-
या हळदी सोहळ्यासाठी शर्वरीने म्हणजेच अभिनेत्री सायली संजीवने खास लूक केला होता.
-
हळद समारंभासाठी शर्वरीने खास लाल काठं असलेली पिवळ्या रंगाची सिल्क साडी पिरधान केली होती.
-
यावर तिने खास फुलांचे दागिने परिधान केले होते. कपाळावर सुंदर फुलांची बिंदी, कानातही फुलांनी तयार केलेले कानातले या खास लूकमध्ये शर्वरीचं सौंदर्य आणखीच उजलळं होतं.
-
तर शर्वरीच्या हातावरील मेहंदी देखील चांगलीच रंगल्याचं दिसतंय.
-
हळद समारंभाच्या निमित्ताने सेटवरच फोटोशूट करण्यात आलं.
-
हळद लागल्यानंतर शर्वरीची सौंदर्य अधिक खुलून आलं.
-
घरात लगीनघाई असल्याने शर्वरीसह सगळेच आनंदात आहेत.
-
तर शर्वरीप्रमाणेच शंतनूलादेखील हळद लागली आहे. आता शर्वरी आणि शंतनू बोहल्यावर चढण्यासाठी तयार आहेत.

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर