-
मालिका असो किंवा सिनेमा शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील आवर्जून योग साधना करतात. फिटनेससोबच मनाची एकाग्रता आणि मन:शातीसाठी योगाचा उपयोग होतो. आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणारे मराठी कलाकार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत.
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी योग करणं पसंत करते. प्राजक्ता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अमेकदा योगा करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
-
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही सोशल मीडियावर योग करतानाचे फोटोज शेअर करत असते, आजच्या काळात योग किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या चाहत्यांना योग करण्यासाठी प्रेरित करत असते.
-
तर अभिनेत्री प्रिया बापटदेखील फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. लॉकडाऊनच्या काळात जिम बंद असल्याने प्रियाने घरीच नियमित व्यायामासोबतच योग करण्यावर भर दिला.
-
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरी म्हणजे अभिनेत्री गिरीजा प्रभू योगा प्रेमी आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राबाहेर शूटिंग सुरू असलं तरी गिरीजाने योगा करणं मात्र थांबवलेलं नाही. गिरीजा नियमित योगा करते. तसचं सोशल मीडिया अकाऊंटवर योगा करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते.
-
गिरीजा प्रमाणेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' अर्थातच अभिनेत्री माधवी निमकरनेदेखील योगाला कायम महत्व दिलं. फिट राहण्यासाठी माधवीचा योगा करण्यावर भर असतो.
-
'आई कुठे कायम' करते मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले व्यायाम आणि योगा करताना दिसते. सध्याच्या काळात महाराट्राबाहेर शूटिंग सुरू आहे. अशात रुपाली सेटवरील तिच्या सहऱ्यांना सोबत घेत व्यायाम आणि योगा करते.
-
हेल्दी राहण्यासोबत निरोगी आयुष्यासाठी अभिनेत्री सोनाली खरे नियमित योगा करते.
-
योगाच्या मदतीने सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने स्वत:मध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. रिंकूने वजन कमी करत फिटनेसकडे लक्ष दिलंय.
-
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रुचीरा जाधवदेखील योगा प्रेमी आहे. वेळ मिळेल तेव्हा कायम रुचीरा योगा करते. (All Photo-Instagram)

Manikrao Kokate : “आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला”, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या हातात काही राहिलं नाही”