-
दाक्षिणात्य अभिनेता थलपथी विजय हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयचा आज २२ जून रोजी वाढदिवस आहे. आज विजय ४७ वर्षांचा झाला आहे. विजयने आता पर्यंत ६४ पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत.
विजयने त्याच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हाच विजय भारतातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या संपत्ती बद्दल जाणून घेऊया.. (Photo Credit : Vijay Facebook) -
२०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे ४१० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.
-
विजयचे वार्षिक उत्पन्न हे १०० ते १२० कोटींचे आहे.
-
विजय दरवर्षी एका ब्रॅंडची जाहिरात करण्यासाठी जवळपास १० कोटी रुपये घेतो. विजय कोका -कोला, चेन्नई सुपर किंग्जसाठी आणि इतर काही ब्रॅंडसाठी काम करतो. (Photo Credit : Express archive photo)
विजयच्या लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट गाडी आहे, ज्याची किंमत ही ६ कोटीच्या जवळपास आहे. ऑडी ए८ ही गाडी जवळपास १.३० कोटीच्या जवळपास आहे. -
बीएमडब्ल्यू सीरिज ५ या गाडीची किंमत ही ७५ लाख रुपयाच्या आसपास आहे. बीएमडब्ल्यू एक्स ६ या गाडीची किंमत ही ९० लाख रुपये आहे. मिनी कूपर या गाडीची किंमत ही ३५ लाख रुपये आहे.
-
विजयने त्याचा आगामी चित्रपट 'बीस्ट'साठी १०० कोटी रुपयांच मानधन घेतलं आहे.
-
१०० कोटी रुपयांचे मानधन घेत विजयने लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना मागे टाकलं आहे. तामिळ अभिनेत्यांमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारे अभिनेते रजनीकांत होते.
-
'बीस्ट' या चित्रपटासाठी आकारलेल्या या मानधनामुळे तामिळ चित्रपटातसृष्टीत सगळ्यांत जास्त मानधन घेणार अभिनेता विजय ठरला आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन