-
बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रेखा. एकेकाळी अनेक अभिनेत्यांना रेखा यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. रेखा या त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. यामधील एक नाव म्हणजे राज बब्बर.
-
रेखा यांच्या आयुष्यात राज बब्बर यांची एण्ट्री झाली होती.
-
पण फार कमी लोकांना याविषयी माहिती आहे.
-
राज बब्बर यांची पत्नी स्मिता पाटील यांचे निधन झाल्यानंतरच्या काळात हे घडले होते.
-
त्यावेळी रेखा यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रेकअप झाला होता.
-
८०च्या दशकात राज आणि रेखा यांच्या भेटीगाढी वाढल्या होत्या. त्यामुळे ते चर्चेत होते.
-
रेखा यांना राज बब्बर यांच्याशी लग्न करायचे होत. पण राज बब्बर यांना ते मान्य नव्हते.
-
राज बब्बर त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत जाणार होते. एकदा राज यांनी रेखाला याबात सांगितले.
-
त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले.
-
दरम्यान रेखा यांना राग अनवार झाला. त्या राज यांच्या जुहू येथील घरातून अनवाणी चालत निघाल्या होत्या.
-
रेखा यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. पण अनेकांनी त्यांना रस्त्यावर अनवाणी चालताना पाहिले होते.
-
एका मुलाखतीमध्ये राज बब्बर यांनी रेखासोबत अफेअर असल्याचे म्हटले होते.
-
'रेखासोबत माझे चांगले नाते होते. पण काही कारणास्तव आमच्यामध्ये वाद झाला. एक वेळ अशी आली की रेखाने हे नाते तोडले. पण स्मिता सोबत असलेले नाते हे फार वेगळे होते' असे राज म्हणाले होते.
धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल