-
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस लूक आणि फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. तिचं सौदर्य कायमचं चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. मात्र आता पुन्हा एकदा उर्वशीच्या सौदर्यापेक्षा तिचा लूक आणि तिची साडी जास्त चर्चेत आली आहे.
-
उर्वशी रौतेला नुकतीच लोकप्रिय अभिनेते मनोज कुमार यांची नात मुस्कान गोस्वामीच्या एका प्री-वेडिंग सेरिमनीसाठी पारंपरिक लूकमध्ये दिसून आली
-
उर्वशी रौतेलाने मेहंदी सेरेमनीसाठी गुजराती पटोला साडी परिधान केले होती. आशा गौतम यांनी खास उर्वशीसाठी ही साडी तयार करून घेतली होती.
-
पटोलासोबतच तिने हेवी गोल्ड ज्वेलरी परिधान केली होती.तसचं खास हेअर स्टााईल आणि मेकअपमुळे उर्वशी चांगलीच उठून दिसत होती
-
उर्वशी रौतेलाचे स्टायलिस्ट तुषाप कपूर यांनी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीच्या लूकबद्दल खुलासा केलाय. उर्वशीचा हा लूक तब्बल ५८ लाख रुपयांचा असल्याचं ते म्हणाले.
-
-
स्टायलिस्ट तुषार कपूर यांनी उर्वशीने परिधान केलेली साडी तयार करण्याची ६ महिने लागल्याचं सांगितलं. जवळपास ७० दिवस साडीच्य़ा सिल्क धाग्यांना रंग देण्यात गेले. तर साडी विणण्यासाठी २५ दिवस कारागिरांना काम करावं लागलं.
-
या पटोला साडीसाठी जवळपास ६०० ग्रॅम सिल्कची आवश्यकता होती. जवळपास १२ लोकांनी २ वर्षांहून अधिक काळ या कामासाठी व्यतीत केला. २७ पटोला साड्या तयार होतील इतक्या मटेरिअल्सचा वापर या साडीसाठी करण्यात आलाय.
-
यासोबतच उर्वीशीने या साडीवर गळ्यात एक हेवी नेकलेस आणि हातातही हेवी गोल्डन बांगड्या घातल्या आहेत.उर्वशीने केलेली खास हेअर स्टाइलदेखील सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
-
पटोला साडी ही गुजराती पारंपरिक साड्यांपैकी एक आहे.
-
काही हजारांपासून अगदी लाखांच्या घरात पटोला साडीच्या किंमती बाजारात पाहायला मिळतात. (All Photo-Instagarm@urvashirautela)

होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती