-
कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील काही पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील काही कालाकारांमध्ये खूप चांगले नाते तयार झाले आहे. खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं.
-
मालिकेचे शूट करत असताना सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात. तसंच काहीसं इंदूच्या भूमिका साकारणार्या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं. ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील ते खूप सुंदर आहे आणि अगदीच तसेच ऑफस्क्रीन देखील त्यांचे नाते खूप छान आहे.
-
या मालिकेतील लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने त्यांच्या ऑफस्क्रीन नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. “अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. त्या खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं. कसं माझं काम अजून चांगलं होईल यासाठी नेहेमी मला ती मदत करते. तिच्याकडे सगळ्या अडचणींवर उपाय असतात. " असं अक्षया म्हणाली.
-
अक्षया आणि अतिशा नाईक सेटवर देखील खूप गप्पा मारतात. अतिशा नाईक यांच्या रुपात चांगली मैत्रिण मिळाल्याचं अक्षया सांगते.
-
."दिवाळीला तिने आमच्यासाठी फराळासोबत एक पत्र दिलं होतं तेंव्हा खूप आनंद झाला होता. आम्ही सगळेच घरापसून लांब आहोत, पण आईची कमतरता ती असल्यामुळे भासत नाही इतक प्रेम करते.” असं अक्षया म्हणाली.
-
मालिकेप्रमाणेत सेटवरदेखील अक्षया आणि अतिशा नाईक यांच्या मध्ये जिव्हाळ्याचं नातं आहे.

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”