-
इगतपुरी इथं नाशिक पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रेव्ह पार्टी सुरु असल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी या कारवाईत १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना अटक केली होती. यात मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आलीय.
-
अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये मराठी 'बिग बॉस' फेम अभिनेत्री हिना पांचाळचं नाव समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्यामुळे हिना पांचाळ नेमकी कोण आहे अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.
-
हिना पांचाळने २०१४ साली करिअरला सुरुवात केलीय हिनाने अनेक दाक्षिणात्या सिनेमांमध्ये काम केलंय. तसचं काही मराठी सिनेमांमध्ये देखील ती झळकली आहे. अभिनेत्रीपेक्षा आयटम गर्ल म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली.
-
हिना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जास्त लोकप्रिय असली, तरी ‘बिग बॉस मराठी’मुळे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती.
-
'बिग बॉस'च्या महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता.
-
हिनाने पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
-
हिना तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. बिग बॉसच्या घरातही हिनाचा बोल्ड अंदाज दिसून आला होता.
-
हिना फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर ती तिच्या वर्क आऊटचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.
-
हिनाला तिच्या लूकमुळे ती मलायका अरोराची कॉपी असल्याचं देखील म्हंटलं जातं.
-
इगतपुरीमधील रेव्ह पार्टीत हिनाचं नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी स्काय ताज व्हिला या बंगल्यात हाय प्रोफाईल रेव्ह पार्टी सुरु होती. नशेत नाचगाणी, हुक्का आणि ड्रग्जचं सेवन केलं जात होतं. बेधुंद होऊन पार्टीत सर्वजण गुंग झाले होते. (All Photo-instagram@theofficialheena)

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”