-
बॉलिवूड सेलिब्रिटींसह हॉलिवूड आणि क्रिडा जगतातले अनेक सेलिब्रटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं आपण पाहतो. खास करून इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत हे सेलिब्रिटी चाहत्यांशी संवाद साधत असतात. इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हे सेलेब्स केवळ चाहत्यांशी संवाद साधत नाही तर इन्स्टावरून ते कमाई देखील करत असतात. अनेक ब्रॅण्डसाठी सेलिब्रिटी प्रमोशनल पोस्ट शेअर करत असतात. या प्रत्येक पोस्टमधून ते बक्कळ पैसे कमावत असतात. इन्स्टाग्रामने यापैकी काही टॉप सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. यात हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच भारतीय सेलेब्सचा देखील समावेश आहे.
-
इन्स्टाग्रामवर बक्कळ कमाई करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. रोनाल्डो एका इन्स्टा पोस्टसाठी जवळपास १२ कोटी रुपये घेतो. (Photo-instagram@cristiano)
-
तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा भारतातील पहिला सेलिब्रिटी आहे. संपूर्ण जगाच्या यादीत तो १९व्या क्रमांकावर आहे. विराट एका पोस्टसाठी ५ कोटी रूपयांहून अधिक मानधन घेतो. (Photo-instagram@virat.kohli)
-
तर बॉलिवूडची देसी गर्ल अनेकदा इन्स्टाग्रामवर विविध ब्रॅण्डस् प्रमोट करताना दिसते. या प्रत्येक इन्स्टा पोस्टसाठी प्रियांका चोप्रा ३ कोटी रुपये घते. इन्स्टाग्रामच्या या टॉप १०० लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा वगळता कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीचा समावेश नाही. (Photo-instagram@priyankachopra)
-
द रॉक' म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला रेसरल आणि हॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. रॉक एका इन्स्टा पोस्टमधून ११ कोटी रुपये कमावतो.(Photo-instagram@ therock)
-
लोकप्रिय अमेरिकन सिंगर आणि अभिनेत्री आरियाना ग्रांडे या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आरियाना देखील तिच्या एका इन्स्टा पोस्टमधून जवळपास ११ कोटी रुपये कमावते. .(Photo-instagram@ arianagrande)
-
तर प्रसिद्ध अमेरिकन मॉडल आणि बिजनेसवुमन काइली जेनर एका इन्स्टापोस्टसाठी ११ कोटींहून अधिक रक्कम आकारते. .(Photo-instagram@kyliejenner)
-
तरुण वर्गात क्रेझ असलेली अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री सेलीना गोमेज या यादीत पाचव्या स्थानावर असून ती एका इन्स्टा पोस्टमधून ११ कोटी कमावते. .(Photo-instagram@selenagomez)
-
तर अमेरिकन टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्दशियन इंस्टाग्राम वरील एका पोस्टमधूीन 10 कोटी कमावते. इन्स्टाग्रामवर तिचे २२ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. .(Photo-instagram@kimkardashian)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”