-
१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. या बातमीने चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खानच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळतो.
-
काही काळापूर्वी आमिर खानचं नावं अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं गेलं होतं. 'दंगल' सिनेमात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर फातिमा आणि आमिर यांच्यात काहीतरी शिजतंय अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. मात्र फातिमानं कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता.
-
मात्र आता किरण रावसोबत आमिरने घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा एकदा फातिमाचं नाव चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर फातिमा ट्रेंडिंगमध्ये आहे. आमिर खान आता फातिमासोबत तिसरं लग्न करणार असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर आमिर आमि फातिमाला आधीच लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आमिर खानसाठी लग्न करण्यासाठी फातिमा तयार अशा आशयाचं मीम
-
तर 'ठग्स ऑफ हिदूस्तान'मध्ये देखील आमिर आणि फातिमा एकत्र झळकले होते. यात 'फसवणं स्वभाव आहे माझा' म्हणणारं आमिरचं मीम
-
आमिर आणि किरणने एकमेकांच्या सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विभक्त होण्याचं कोणतही कारणं मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे आमिरने दुसऱ्यांदा घटस्फोट का घेतला असा प्रश्न चाहत्यांना भेडसावू लागला आहे.
-
'अशी कोणतीही मुलगी नाही जिला बाबूजीने घटस्फोट दिला नाही'
-
आता आमिरपुढे दोन पर्याय आहेत एली अवराम किंवा फातिमा असं या मीममध्ये म्हंटलंय.
-
तर नेटकऱी या प्रकरणातही सलमान खानला विसरलेले नाही. "माझं लग्न कधी होणार?" असं सलमान खान म्हणत असल्याचं या विनोदी मीममध्ये दाखवण्यात आलंय.
-
तर आमिरच्या या कामगिरीने मोदी देखील थक्क झाल्याचं या मीममध्ये दाखवण्यात आलंय. (All Photo-twitter)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ