-
अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावरही अनन्याचे लाखो चाहते आहेत. अनन्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतेच अनन्याने समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
-
अनन्याने शेअर केलेल्या समुद्र किनाऱ्यावरील खास फोटोंना तिने दिलेलं हटके कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोला अनन्याने 'माझे स्वत:सोबतचे कहोना प्यार है क्षण' असं हटके कॅप्शन दिलंय.
-
या फोटोत अनन्याने पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. तर काही फोटत तिने या ड्रेसवर जॅकेटही परिधान केलंय.
-
या फोटोंमध्ये अनन्याचे वेगवेगळे मूड्स दिसून येत आहेत. तर तिच्या मागे निळाशार अथांग समुद्र दिसून येतोय.
-
अनन्याच्या या फोटोला अनेक सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखील मोठी पसंती दिली आहे. (All Photo-instagram@ananyapanday)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख