-
बॉलिवूडचा गली बॉय रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. अनेक सेलिब्रिटींसह चाहते सोशल मीडियावरून रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने रणवीरने बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलंय. पण तुम्हाला माहित आहे का? ज्या अनेक सिनेमांमुळे रणवीर स्टार बनला ते सिनेमा आधी अभिनेता रणबीर कपूरला ऑफर झाले होते. (Photo-Instagram@ranveersingh)
-
रणवीर सिंहच्या करिअरमधील चार हिट ठरलेले सिनेमा आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आले होते. मात्र रणबीर कपूरने या ऑफर नाकारल्याने ते सिनेमा रणवीरला करण्याची संधी मिळाली आणि तो सुपरस्टार झाला. (File Photo)
-
यातला पहिलाच सिनेमा म्हणजे 'बॅण्ड बाजा बारात' या सिनेमातून रणवीरने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. अनुष्का शर्मा आणि रणवीरच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. मात्र रणवीर आधी हा सिनेमा रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. (Photo-Indian Express)
-
संजय लीला भन्साळींचा 'राम लीला' या सिनेमाने प्रेक्षकांना भुऱळ घातली होती. या सिनेमात रणवीर आणि दीपिका पदूकोण पहिल्यांदा एकत्र झळकले. या सिनेमाच्या शूटिंगपासूनच त्याच्या लव्ह स्टोरीला देखील सुरुवात झाली होती. मात्र या सिनेमासाठी देखील भन्साळींनी आधी रणबीर कपूरची निवड केली होती. तर याचवेळी दिग्दर्शक अनुराग कश्यपने 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमासाठी देखील रणवीर सिंहला निवडलं होतं. मात्र कालांतराने अनुराग अश्यपने रणवीर ऐवजी रणबीर कपूरला सिनेमात घेतलं. तर 'राम लीला'साठी रणवीर सिंहला कास्ट करण्यात आलं. (Photo-Indian Express)
-
यशराज फिल्मचा रणबीर कपूरने रिजेक्ट केलला आणखी एक प्रोजेक्ट म्हणजे 'बेफिक्रे' हा सिनेमा. या सिनेमात नंतर रणवीर सिंहने त्याची जादू दाखवली. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी तरुणांनी मात्र सिनेमाला पसंती दिली होती. (Photo-Indian Express)
-
जोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या सिनेमामुळे रणवीर सिंहचं मोठं कौतुक झालं. या सिनेमाने सर्वांचीच मनं जिकंली होती. या सिनेमासाठी रणबीर कपूरला सिद्धांत चतुर्वेदीच्या एमसी शेरच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र रणबीरला सपोर्टिंग रोल करायचा नसल्याने त्याने ही ऑफर नाकारली. (Photo-Indian Express)
-
रणवीर सिंहने आजवर रोमॅण्टिंक हिरो ते बाजीराव सारख्या ऐतिहासिक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Photo-Instagram@ranveersingh)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश