-
छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'देवमाणूस'.
-
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी 'देवमाणूस' ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
या मालिकेतील डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंगल, डॉक्टर अजितकुमार ही पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहेत.
-
'देवमाणूस' या मालिकेत टोण्या आणि डिंपीची आई मंगलची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली जोगळेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
अंजली जोगळेकरने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
अंजलीने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये भूमिका साकारल्या आहेत.
-
उत्तम अभिनेत्री असलेल्या अंजलीला काही पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अंजलीचा फॅनफॉलोइंग मोठा आहे.
-
अंजलीच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंजली जोगळेकर / इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?