-
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
हिंदी सिनेसृष्टीचे 'किंग ऑफ ट्रेजेडी' दिलीप कुमार उर्फ युसूफ खान आणि सायरा बानो यांचे प्रेम कोणत्याही परिकथेपेक्षा कमी नाही.
-
साठच्या दशकातील विनोदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्या सायरा दिलीप कुमार यांच्या 'आन' या चित्रपटातील अभिनयाने प्रभावित झाल्या.
-
दिलीप कुमार यांच्या ब्लॉकबस्टर 'मुघल-ए-आझम' च्या प्रिमिअर दरम्यान सायरा यांना दिलीप कुमार यांची अनुपस्थिती चांगलीच जिव्हारी लागली होती.
-
त्यानंतर सरतेशेवटी सायरा बानू एका मुलाखती दरम्यान दिलीप कुमार यांना भेटल्या होत्या.
-
यावेळी दिलीप कुमार यांनी सायराला सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. सायरांना यावेळी मनात खोलवर दिलीप कुमार यांच्याशीच आपला विवाह होईल असे वाटले होते.
-
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सायरा बानो यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायरा बानो यांनी १९६१मध्ये शम्मी कपूर यांच्या 'जंगली' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
अभिनय तर बहाणा होता दिलीप कुमार यांच्या जवळ येण्याचा. सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केले, तेव्हा त्या त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षे इतके होते.
-
सुरुवातीला सायरा यांच्या भावना दिलीप कुमार समजू शकले नव्हते.
-
फार कमी वयातच सायरा बानो दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करु लागल्या होत्या.
-
आधी दिलीप कुमार तयार नव्हते, पण नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला.
-
सायरा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत १९६६ मध्ये लग्न केले.
-
२२ वर्षीय अभिनेत्री सायरासोबत दिलीप कुमार अखेर विवाहबद्ध झाले. यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षे इतके होते.
-
सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा साभाळ केला आणि त्यांना साथ दिली. (सर्व फोटो सौजन्य : दिलीप कुमार / ट्विटर)
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल