-
'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेत शंतनूचा नुकता लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर आता या मालिकेतील शंतनू म्हणजे अभिनेता सुयश टिकळ त्याच्या खऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालाय. सुयशचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सुयशने चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला आहे.
-
सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री आयुषी भावेसोबत सुयशचा साखरपुडा झाला आहे.
-
आयुषीने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याच्या सोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत सुयशने दाक्षिणात्य वेशभूषा केली आहे. त्याने लुंगी आणि शर्ट परिधान केला आहे. तर, आयुषीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुयशचा साखरपुडा पार पडला. मात्र आज आयुषीचा वाढदिवस असून त्याच निमित्ताने सुयशने हे फोटो शेअर केले आहेत.
-
सुयश टिकळच्या या साखरपुड्याच्या फोटवर त्याच्या अनेक कलाकार मित्र मैत्रिणींनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
आयुषी 'महाराष्ट्राची श्रावणक्वीन' या स्पर्धेची विजेती ठरली होती. तसतं युवा डान्सिंग क्वीन’ या शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.
-
आता लवकरच आयुषी ‘या गावाचं की त्या गावाचं’ या चित्रपटात दिसणार आहे. आयुषी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते..(Photos- instagarm@suyashtlk/aayushibhave)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ