-
ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने नुकतीच विम्बल्डनमध्ये हजेरी लावली. (Photo: Priyanka Chopra Instagram)
-
प्रियांका चोप्रासोबत यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला उपस्थित होत्या.
-
प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामला मैदानातील फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा अत्यंत ग्लॅमरस दिसत असून स्पर्धैचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.
-
प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम स्टोरीमध्येही फोटो शेअर केले आहेत.
-
ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अॅश्ले बार्टी आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्या हा अंतिम सामना पार पडला.
-
अॅश्ले बार्टीने या संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले.
-
फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (२०१९) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
-
प्रियांका चोप्राने फोटोंमध्ये बार्टीचं अभिनंदन केलं आहे.
-
प्रिन्स विलियम आणि केट मिडल्टनदेखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
-
प्रियांका सध्या लंडनमध्ये असून Citadel या नव्या सीरिजसाठी काम करत आहे.
-
लंडनला परतण्यापूर्वी प्रियांका चोप्रा कॅलिफोर्नियामध्ये परतली होती.
-
प्रियांका चोप्रा पती निकसोबत कॅलिफोर्नियात वास्तव्यास आहे.
-
पती निक जोनससबोत काही वेळ घालवल्यानंतर ती पुन्हा लंडनला परतली.
-
Citadel एक मल्टी-सीरिज आहे. भारत, इटली, मेक्सिकोमधील प्रोडक्शन हाऊस याची निर्मिती करत आहेत.
-
Russo Brothers या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.
-
All Photos: Priyanka Chopra Instagram

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO