-
बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार येत्या १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. राहुल आणि दिशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.
-
राहुल आणि दिशाची लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. संगीत सेरेमनीसाठी दोघं डान्सचा सराव करत असतानाचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दिशाने तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचे काही फोट समोर आले आहेत.
-
दिशा परमारने तिच्या मैत्रिणींसोबत धमाल बॅचलरेट पार्टी केली आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या धमाल पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.
-
या पार्टीसाठी खास सजावट केली असल्याचं फोटोत पाहायला मिळतंय. दिशाच्या मैत्रिणींनी तिला हे खास सरप्राइज दिलंय. तर दिशाने "आय लव्ह यू गर्ल्स' असं कॅप्शन तिच्या पोस्टला दिलंय.
-
तर राहुल वैद्यने देखील दिशाच्या या फोटोंवर खास कमेंट केली आहे. "माझी वधू" अशी कमेंट करत त्याने हार्टचे इमोजी दिले आहेत.
-
राहुल वैद्यने सांगितल्याप्रमाणे अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित दिशा आणि राहुलचा लग्नसोहळा पार पडणार आहे. (All Photo-instagram@dishaparmar)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ