-
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता.(Photo-indian express)
-
१९७८ सालामध्ये आलेल्या 'किस्सा कुर्सा का' या सिनेमातून सुरेखा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सुरेखा यांनी अनेक बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. .(Photo-indian express)
-
'परिनती', 'नझर', 'करामती', 'सरदारी बेगम' हे त्यांचे काही सुरुवातीच्या काळातील सिनेमे त्याचसोबत त्या 'सरफरोश', 'दिललगी', 'झुबेदा' या सिनेमांमध्ये झळकल्या होत्या. अलिकडची त्यांची गाजलेली भूमिका म्हणजे 'बधाई हो' सिनेमातील दादीची भूमिका.(Photo-youtube/colors tv)
-
सुरेखी सीकरी यांना आजवर तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 'तमस', 'मम्मो', आणि 'बधाई हो' या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांमा बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय.Photo-jaglee tv)
-
बॉलिवूड सिनेमांसोबत सुरेखा सीकरी यांनी छोट्या पडद्यावरदेखील त्यांच्या कमाल अभिनयाने चाहत्यांची पसंती मिळवली होती. 'बालिका वधू' मालिकेतील 'दादी' ही भूमिका चांगलीच गाजली होती. या भूमिकेतून त्या घराघरात पोहचल्या होत्या.. (Photo-youtube/colors tv)
-
तर बधाई हो या चित्रपटातली त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.(Photo-jaglee tv)
१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं