-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहे. तारक मेहता या मालिकेत जेवढे कलाकार काम करतात त्यांच खरं नाव त्यांच्या चाहत्यांना माहित आहे. गेल्या ४ वर्षांपासून दयाबेन मालिकेत नसली तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या ही कमी झालेली नाही. आज आपण 'तारक मेहता…' मालिकेती कलाकारांचे लहानपणाचे तसेच तरुणपणीचे काही दुर्मिळ फोटो पाहणार आहोत.
-
दिशा वकानी – दिशाचा हा फोटो लहानपणीचा आहे. हा फोटो दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
-
दिशाने 'तारक मेहता…'मध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती. २०१७ मध्ये गर्भवती असल्याने दिशाने ती मालिका सोडली. या गोष्टीला ४ वर्ष झाले असले तरी देखील दिशाची वाट तिचे चाहते पाहत आहेत.
-
दिलीप जोशी – जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीचा हा फोटो थेटरच्या दिवसातला आहे. हा फोटो त्यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
थेटरमध्ये काम केल्यानंतर दिलीप बॉलिवूडकडे वळले. दिलीप यांनी सलमान खानपासून शाहरुख खान पर्यंत सगळ्यासोबत काम केले आहे. मात्र, दिलीप जोशीला खरी लोकप्रियता ही जेठालाल या भूमिकेमुळे मिळाली.
-
अमित भट्ट – अमित भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट आणि छोट्या पडद्यावर काम करत आहेत. मात्र, त्यांना खरी लोकप्रियता ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बापूजीची भूमिका साकारल्यामुळे मिळाली आहे.
अमित भट्ट या मालिकेत २००७ पासून बापूजीची भूमिका साकारत आहेत. -
शैलेश लोढा – 'तारक मेहता..' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढाला या आता चाहते तारक मेहता म्हणून ओळखतात.
-
२००८ पासून शैलेश 'तारक मेहता..' या मालिकेत काम करतो. शैलेश अभिनेता सोबतच एक कवी देखील आहे.
-
मुनमुन दत्ता – 'तारक मेहता..'मध्ये बबिताजीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ताने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. २००४ मध्ये 'हम सब बाराती' या मालिकेतून छोट्या पडद्यावर मुनमुनने एण्ट्री केली.
-
त्यानंतर मुनमुन काही चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, मुनमुनला 'तारक मेहता..' या मालिकेतील बबिताजीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळाली. आता लोक तिला बबिताजी म्हणूनच ओळखतात.
सोनालिका जोशी – 'तारक मेहता..' मालिकेत मिसेस भिडेची भूमिका साकारणारी सोनालिका लहानपणापासून अशीच दिसते. सोनालिकाने तिच्या करिअरची सुरुवात ही 'तारक मेहता..' या मालिकेतूनच केली आहे. -
मंदार चांदवडकर – मिस्टर भिडे ही भूमिका साकारत प्रकाश झोतात आलेला मंदार कधी मॅकेनिकल इंजिनीअर होता.
-
'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, अभिनय कराची इच्छा असल्याने त्याने इंजिनियरींग सोडली. त्यानंतर ८ वर्ष त्याने स्ट्रगल केलं आणि त्यानंतर त्याला 'तारक मेहता…' ही मालिका मिळाली.
-
जेनिफर मिस्त्री बन्सीवाल – 'तारक मेहता..'मध्ये जेनिफर मिस्त्री बन्सीवाल मिसेस सोढीची भूमिका साकारत आहे. २००८ पासून जेनिफर या मालिकेत काम करत आहे. आज तिला प्रत्येक व्यक्ती मिसेस सोढी म्हणून ओळखतात.
जेनिफरने तिच्या करियरची सुरूवात 'तारक मेहता..' पासून केली. 'एयरलिफ्ट', 'हल्ला बोल' आणि 'क्रेजी ४' सारख्या चित्रपटांमध्येही ती दिसली. -
निर्मल सोनी – डॉक्टर हाथी ही भूमिका साकारणारा अभिनेता निर्मल सोनीचा हा लहानपणीचा फोटो आहे. निर्मलला डॉक्टर हाथीच्या भूमिकेने लोकप्रियता मिळाली.
-
निर्मल यांनी २००८ ते २००९ पर्यंत या मालिकेत काम केले. त्यानंतर अभिनेता कवि कुमार आजादने डॉक्टर हाथीची भूमिका साकारली. मात्र, २०१८ मध्ये कवि कुमार आजाद यांच्या निधनानंतर निर्मल सोनी पुन्हा ही भूमिका साकारु लागले.
अंबिका रंजनकर – 'तारक मेहता..' मालिकेत अंबिका मिसेस हाथीची भूमिका साकारते. अंबिकाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 'तारक मेहता..' या मालिकेतून अंबिकाला लोकप्रियता मिळाली. -
तन्मय वेकारिया – 'तारक मेहता..' या मालिकेत तन्मय बागाची भूमिका साकारतो. तन्मयने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल