-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर भेटीला येत नसली तरी सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या वेगवेगळ्या फोटोंमधून ती नेहमीच समोर येतेय. सध्या ती पती विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये टीम इंडिया यावेळी न्यूझीलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळत आहे. पण अशात अनुष्का मात्र इंग्लंडमध्ये धमाल मस्ती करताना दिसून येतेय.
-
अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंड टूर एन्जॉय करतेय. नुकतंच तिने इंग्लंडमधल्या शहरांमध्ये फिरतानाचे फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत. एका टूरिस्ट पॉइंटवर विराटसोबत ती धम्माल करताना दिसून येतेय.
-
हे फोटो शेअर करताना अनुष्काने एक कॅप्शन सुद्धा लिहिलंय. यात तिने लिहिलंय, "इंग्लंडच्या शहरांमध्ये फिरत असताना मी केसांमध्ये हात फिरवताना एका फॅनने माझे हे फोटो क्लिक केले. फॅन्ससाठी काहीपण".
-
इंग्लंडमधल्या शहरांमध्ये फिरत धमाल मस्तीच्या फोटोजवर तिच्या चाहत्यांनी कमेटंस् करत लाइक्सचा वर्षाव केलाय. यावेळी तिने ब्राउन स्वॅटशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. यात ती खूपच सुंदर दिसून आली.
-
तर विराट कोहली स्वेटशर्ट आणि ब्राउन ट्राउजरमध्ये खूपच हॅंडसम दिसून आला. या दोघांच्याही चेहऱ्यावर एन्जॉय करतानाचा आनंद झळकत होता.
-
अनुष्का शर्मानं याआधीही इंग्लंडमधून अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या अनुष्का मुलगी वामिकासोबत टीम इंडियाला चिअरअप करत आहे.
-
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरला कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांच्यासोबत २०१८ साली रिलीज झालेल्या 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्कानं अद्याप कोणताही चित्रपट साइन केलेला नाही. सध्या ती मुलगी वामिकासोबत आपलं आईपण अनुभवत आहे.
१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं