-
बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रात बरेच सेलीब्रिटीज आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत . पाहुयात कोण होते ते कलाकार ज्यांना चढावी लागली होती न्यायालयाची पायरी. (photo-instagram)
राज कुंद्रा- सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तासाच्या चौकशी नंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली आहे. (photo-Indian express) -
करण मेहरा – काही दिवसांपूर्वी 'ये रिशता क्या कहलाता है' अभिनेता करण मेहेराला अटक झाली होती. करणच्या बायकोनी घरगुती हिंसेचा आरोप त्याच्यावर केला होता. (photo-Karan Mehara Instagram)
सलमान खान- बॉलीवूड अभिनेता सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत कायद्याच्या कचाट्यात सापडला जातो. सलमानच्या 'बिइंग ह्यूमन'च्या विरोधात तक्रार केली होती. तक्रार करणाऱ्या माणसाने सलमान आणि त्याच्या कंपनीला नोटिस देखील पाठवली होती. (Photo- file photo) गहना वशिष्ट- वेब सिरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड करणे, स्वतः प्रॉडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ, साईटवर अपलोड करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्टला अटक केली होती. नंतर तिची जामिनावर सुटका झाली आहे. (photo-Gehena vasistha Instagram) -
एजास खान- 'बिग बॉस ७' फेम एजास खानला अनेकदा अटक झाली आहे. मागच्या वर्षी एजासला ड्रग केस संदर्भात 'एन सी बी' ने तो बाविमानतळावरूनच अटक केली होती. या आधी पण त्याला ड्रग केस संदर्भात अटक करण्यात आली होती. (photo- ejaz khan instagram)
पायल रोहातगी- पायलला गांधी-नेहरूं बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामूळे तुरुंगात जायला लागले होते. पायल सोशल मीडियावर सक्रिय असून ती सतत विवादीत मुद्द्यांवर ट्वीट करताना दिसते. तसंच काही दिवसांपु्र्वी पायल ज्या सोसायटीत राहते त्या सोसायटीच्या चेअरमनशी तिचा वाद झाला होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या दोन्ही कारणासाठी तिला अटक करण्यात आली होती. (photo-payal rohatagi instagram) श्रुती उल्फत – श्रुती उल्फत हीला आपण बऱ्याच मालिकेत आईची भूमिका साकारताना पाहिल असेल. श्रुती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. श्रुतीने तीच्या इन्स्टग्रामवर ' कोब्रा' (नाग ) बरोबर व्हिडीयो शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहुन सगळेच थक्क झाले असून तिला या कारणासाठी अटक झाली होती. (photo- shruti ulfat instagram) वीणा मलिक -'बिग बॉस' फेम वीणा मलिक धार्मिक भावना दुखवणारं वक्तव्य केल्यामूळे पाकिस्तान कोर्टाने २६ वर्षाची शिक्षा सुनावली होती. (photo-veena malik Instagram) अंश अरोरा- टीव्ही अभिनेता अंशला, मॉलमध्ये हाणामारी करुन सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अंशने बाहेर आल्यावर खुलासा केला की जेलमध्ये त्याला थर्ड डिग्रीचा टॉर्चर केला गेला होता. (photo-Ansh Arora Instagram) -
चाहत पांडे – टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक केली होती. मामाच्या घरी जाऊन तोड फोड करण्याच्या आरोपा त्यांच्यावर करण्यात आला होता. (photo-Chahat Pandey Instagram)
भारती सिंग – भारती सिंगला मागीलवर्षी 'एन सी बी' ने ड्रग केस प्रकरणात अटक करण्यात आली होती. (photo-Bharti Singh Instagram)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”