-
अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
शाश्वतीने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
'चाहूल', 'सिंधू' आणि 'पक्के शेजारी' या मालिका तिच्या लोकप्रिय होत्या.
-
शाश्वतीने रवी जाधव यांच्या 'बालक पालक' चित्रपटात 'डॉली' ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
-
गेल्या वर्षी शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमकरशी लग्नगाठ बांधली.
-
'नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करुइच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा..' अशी पोस्ट शाश्वतीने लॅाकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर शेअर केली होती.
-
आजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
नुकताच शाश्वतीने स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे.
-
'मुदपाकखाना' चव तीच… आपल्या घरची! असं तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
-
चाहत्यांनी शाश्वतीचे कौतुक केले असून तिला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनयाशिवाय इतरही क्षेत्रात सक्रिय असणारे बरेच कलाकार मराठी कलाविश्वात आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शाश्वती पिंपळीकर करमकर / इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक