-
‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ नावाने ज्याला ओळखलं जातं तो बॉलिवूडचा गायक, सॉंग रायटर, व्हॉइस ओव्हर परफॉर्मर आणि अभिनेता अरमान मलिक आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. आज त्याच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…
-
हिंदी सिनेमामधील सुप्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक यांचा नातू आणि अनु मलिक यांचा तो भाचा आहे, हे खूप कमी लोकांना माहित असेल.
-
गायक अरमान मलिक याचा जन्म २२ जुलै १९९५ मध्ये मुंबईत झाला. त्याच्या वडिलांचं नाव डब्बू मलिक असं आहे. अरमान मलिक याला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्याच्या कुटुंबाकडूनच भारतीय शास्त्रीय संगिताचं ट्रेनिंग मिळालं. ज्यावेळी त्याने ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’साठी पहिलं ऑडिशन दिलं, त्यावेळी अरमान केवळ नऊ वर्षाचा होता.
-
‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ मध्ये तो टॉप 7 पर्यंत पोहोचला होता. आज बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध गायक म्हणून लोक त्याच्या आवाजाचे लाखो चाहते झाले आहे.
-
अरमानने जमनाबाई नर्सी स्कूलमधून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. बर्कली कॉलेज ऑफ म्यूजिक बोस्टनमधून त्याने संगीताचे धडे घेतले. त्याच्या लहानपणी त्याच्या रडण्याचा आवाज ऐकूनच तो गायक बनणार असं त्याच्या आई-वडिलांना वाटायचं, असं बोललं जातं.
-
त्याच्या लहानपणी तो शाळेत तो परिक्षा देत होता. त्यावेळी त्याच्या शाळेतल्या एक शिक्षिका धावत पळत त्याच्याकडे आल्या आणि त्याची आई बाहेर वाट पाहत असल्याचं सांगितलं. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तिथे विशाल-शेखर आले असल्याचं त्याने पाहिलं. विशाल-शेखर हे दोघे त्याच्याकडून एका गाण्याची रेकॉर्डिंग करण्यासाठी आले असल्याचं अरमानला कळलं.
-
अमिताभ बच्चनसोबत त्यांच्या ‘भूतनाथ’ चित्रपटासाठी हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. चाइल्ड सिंगर म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता. पण त्याने त्याचं सर्वात पहिलं गाणं अभिनेता सलमान खानसाठी गायलं आहे. ‘तुमको तो आना ही था’ असं त्या गाण्याचं नाव आहे. या गाण्यातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.
-
अरमान मलिक याने त्याच्या छोट्याश्या करिअरमध्ये बरेचसे हिट गाणे दिले आहेत. आतापर्यंत जवळजवळ त्याने 100-200 कमर्शिअल जाहिरातींमध्ये आपला आवाज दिलाय. यासोबतच लंडनमधल्या Wembley थिएटरमध्ये लाइव्ह परफॉर्म करणारा सगळ्यात कमी वयाचा बॉलिवूडमधला गायक ठरला आहे.
-
अरमान मलिक याला त्याच्या 'मैं रहूं या न रहूं' या गाण्यातून वेगळी ओळख मिळाली. हे गाणं कोणत्या चित्रपटातलं नव्हतं. अरमानचा भाऊ अमाल मलिकने या गाण्याला कम्पोज केलं होतं. हे गाणं हिट झाल्यानंर अरमान मलिकाची फॅन फॉलोइंग वाढू लागली.
-
अरमान त्याच्या वयाच्या नवव्या वर्षापासूनच तेलुगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मराठी इंग्रजी भाषेतील गाणे गाऊ लागला. अरमानने अनु मलिक आणि जूही परमारसोबत 'लिटिल स्टार अंताक्षरी' या शोमध्ये होस्टिंग केलं होतं.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”