-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपामुळे चर्चेत आहेत. या प्रकरणात नवीन दुवे जोडले जात आहेत. राज यांच्या व्यवसायाची बातमी समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत घबराट पसरली असून यावर संमिश्रप्रतिक्रिया पहायला मिळत आहे. दरम्यान, पोर्नोग्राफी प्रकरणात यापर्वी अटक झालेली अभिनेत्री गहना वशिष्ठच्या फ्लॅटवर मुंबईतील मालवणीत अवैध कब्जा करण्यात आला आहे, असे गहना वशिष्ठने सांगितले. (photo gehana_vasisth instagram)
-
ज्यांनी कब्जा केला आहे. ते मला जीवे मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी देत आहेत, असा दावा गेहाना वशिष्ठ यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करत नसल्याचे गेहना यांनी म्हटले आहे. (photo gehana_vasisth instagram)
-
एक व्हिडिओ शेअर करत गेहाना यांनी पोलिसांना तिची तक्रार नोंदवून मदत करावी, असे आवाहन केले. अभिनेत्रीने सांगितले की, २०१८ साली तिने मालवणीत फ्लॅट विकत घेतला होता, जो तिने दलालाच्या मदतीने भाड्याने दिला होता. परंतु आता त्यांना समजले की त्यांच्या फ्लॅटवर अवैधपणे कब्जा करण्यात आला आहे.(photo gehana_vasisth instagram)
-
व्हिडिओमध्ये गेहना म्हणते, 'मी माझा फ्लॅट ब्रोकर वसीम व्दारा सुजाता शेट्टी नावाच्या बाईला दिला होता. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी मला पाच महिन्यांपासून भाडे दिले नाही.(photo gehana_vasisth instagram)
-
गहना पुढे म्हणाले, जानेवारीत अचानक मला माझ्या सेक्रेटरीचा फोन आला की तुमच्या फ्लॅटमध्ये काही अज्ञात लोक राहत आहेत. मला भेटा आणि बोल. मी प्रथम मालवणी पोलीस चौकीत गेले आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. यावर ते म्हणाले की तुम्ही ते लेखी द्या.(photo gehana_vasisth instagram)
-
गहना वशिष्ठ पुढे म्हणाली, 'मी माझ्या फ्लॅटवर गेले तर तिथे मी शोएब नावाच्या माणसाला पाहिले आणि तिथे तीन ते चार महिला सोडून बरेच लोक होते. तो म्हणू लागला तू कोण आहेस? तू इथे का आली आहेस? हा माझा फ्लॅट असल्याचे जेव्हा मी म्हणाले, तेव्हा तेव्हा तो म्हणाला हा तुमचा फ्लॅट आहे का? जे करायचे ते करून घे. (photo gehana_vasisth instagram)
-
तुझ्यात हिंमत नसेल तर तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जर तुला पुन्हा इथे दिसलं नाही तर मीही तुझ्यावर बलात्कार करीन. ते तुम्हाला चाचपडतील आणि अशा ठिकाणी तुम्हाला दफन करतील की तुमचा मृतदेह कोठेही सापडणार नाही,अशी धमकी देल्याचे गहना वशिष्ठने सांगितले (photo gehana_vasisth instagram)
-
माझ्याकडे फ्लॅटचे सर्व आवश्यक कागदपत्रे असल्याचे गहाना वशिष्ठ यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी बँकेतून घेतलेल्या कर्जाची कागदपत्रेही त्यांच्याकडे आहेत. पण भाड्याने फ्लॅट दिलेल्या सुजाता शेट्टी नावाच्या महिलेने बनावट कागदपत्रे बनविली.(photo gehana_vasisth instagram)
-
यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली होती.(photo gehana_vasisth instagram)
-
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती.(photo gehana_vasisth instagram)
-
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.(photo gehana_vasisth instagram)
१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं