-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक करण्यात आल्यानंतर अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत आली आहेत. यापैकीच एक म्हणजे शर्लिन चोप्रा. राज कुंद्राच्या अटकेनंतर चौकशीसाठी शर्लिन चोप्राला देखील समन्स पाठवण्यात आला होता.
-
राज कुंद्राच्या अटकेनंतर शेरलिन चोप्रानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तिने या प्रकरणावरची तिची भूमिका स्पष्ट केली होती. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून अनेक पत्रकार, माध्यम प्रतिनिधी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की माझं यावर काय म्हणणं आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की या प्रकरणावर महाराष्ट्र सायबर सेलच्या तपास पथकाला सर्वात आधी मी जबाब दिला आहे. त्यांना सगळ्यात आधी आर्म्सप्राईमबद्दल (ArmsPrime) मीच माहिती दिली आहे”.
-
आपल्याला अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी राज कुंद्राची मोठी भूमिका होती असा आरोप शर्लिनने केला होता. शर्लिनसोबतच पूनम पांडेने देखील राज कुंद्रासोबत करार केला होता.
-
राज कुंद्राच्या अनेक प्रोजेक्टसाठी शर्लिन चोप्राने काम केलंय. यासाठी शर्लिन चोप्राने मोठी रक्कम देखील आकारली आहे.
-
शर्लिन चोप्राचा जन्म ११ फेब्रुवापी १८४ साली हैदराबादमध्ये झालाय. बॉलिवूडमध्ये शर्लिनने खास काम केलं नसलं तरी बॉलिवूडबद्दल अनेक खळबळजनक विधानं करत ती कायम चर्चेत राहिली आहे.
-
२००५ सालामध्ये आलेल्या 'टाइमपास' या सिनेमातून शर्लिनने करिअरची सुरुवात केली. या शिवाय ती 'कामसूत्र-३ डी' या इंग्रजी सिनेमात झळकली होती.
-
सिनेमात पदार्पण करण्याआधी शर्लिन मॉडेलिंग करायची. एका फोटोशूटमुळे शर्लिन चांगलीच चर्चेत आली होती. २०१२ सालामध्ये 'प्ले बॉय' या मासिकासाठी शर्लिनने न्यूड फोटोशूट केलं होतं. यानंतर शर्लिनवर अनेकांनी टीका केली होती.
-
हिंदीसोबतच शर्लिनने काही तेलगू सिनेमांमध्ये देखील काम केलंय
-
एका मुलाखतीमध्ये शर्लिन चोप्राने तिच्या सेक्स लाइफबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. मॉडेलिंगच्या काळात पैसा कमवण्यासाठी अनेकांसोबत बेड शेअर केल्याचा धक्कादायक खुलासा शर्लिनने केला होता.
-
सोशल मीडियावर शर्लिन चोप्रा चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. या फोटोंमुळे देखील ती अनेकदा चर्चेत राहते.
-
गेल्या काही दिवसांपासून शर्लिन सिनेमा आणि अभिनयापासून दूर आहे. शर्लिनने बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.(All Photos-Instagram@sherlynchopraofficial)

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं