-
सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूचं हे पहिलं फोटोशूट असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.
-
या फोटोत रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. डेनिम, टी शर्ट आणि त्यावर चौकटीचं जॅकेट शिवाय जॅकेटला मॅचिंग अशी बॅग हा रिंकूचा लूक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या फोटोत रिंकूचा आत्मविश्वास झळकतोय.
-
मात्र रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेचा शाहीद कपूरचा भाऊ म्हणजेच अभिनेता इशान खट्टरच्या कमेंटने.
-
रिंकूच्या फोटोवर इशानने 'वाइब' अशी कमेंट केलीय. तर रिंकूने देखील काही स्माईली देत इशानला रिल्पाय दिलाय.
-
रिंकू राजगुरुच्या फोटोवर इशान खट्टरी कमेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
-
'सैराट' या सिनेमातून रिंकू राजगुरुने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तर इशान खट्टरने 'सैराट' चा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. (All Photos-Instagram@Rinku Rajguru)

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”