-
काही मतभेदांमुळे छोट्या पडद्यावर असे बरेच कलाकार अहेत ज्यांनी लोकप्रिय शोमधून निघून जाण्याची तयारी केली होती. पाहुयात कोण होते ते कलाकार. (Photo-Official Instagram)
-
कॉमेडियन कपिल शर्मा, शो सोडणार असल्याची चर्चा होती. वाहिनीशी बोलून कपिलने 'द कपिल शर्मा शो'न सोडण्याचा निर्णय घेतला. (Photo-Official Instagram)
-
'ससुराल सिमर का'या लोकप्रिय मालिकेतील सिमर म्हणजेचं दीपिका कक्कर. दीपिका ही मालिका सोडून जाणार की काय? या चर्चेने उधाण घेतला होता. सीमरच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींची नाव देखील शर्टलिस्ट करण्यात आली. मात्र शोच्या आणि तिच्या लोकप्रियतेमुळे तिने या मालिकेत परत येण्याचा निर्णय घेतला. (Photo-Official Instagram)
-
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'स्वरागिनी'मध्ये सुरवातीला तेजस्वी प्रकाशने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र कालांतराने या मालिकेतील तिच्या भूमिकेचं नवं वळणं घेणारं कथानक तेजस्विनीला न पटल्याने तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा रंगू लागल्या.त्यानंतर मालिकेत खूप काही बदल घडवून आणले गेले आणि तेजस्वीने मालिका सोडण्याचा निर्णय मागे घेतला. (Photo-Official Instagram)
-
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो म्हणजे 'सीआयडी'या मालिकेत ऐसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे शिवाजी साटम देखील मालिका सोडून जाणार होते. मालिकेच्या निर्मात्यांसोबत मतभेद असल्यामुळे ही मालिका सोडत असल्याची चर्चा रंगत होती. (Photo-Official Instagram)
-
ये 'रिश्ता क्या कहलाता है'मध्ये नैतिकची भूमिका साकारणारा करण मेहरा शो सोडून जाण्याची बरीचं चर्चा होती. त्यावेळेस करणने दरवेळेस अशी चर्चा रांगते, मात्र मी अजून या मालिकेत आहे असे बोलत या चर्चेला खारीज करायचा. कालांतराने करणने प्रकृतीचे कारण देत ही मालिका सोडली.(Photo-Official Instagram)
-
'बिग बॉस १४' फेम अभिनेत्री जास्मीन भसीन 'टशन-ए-इश्क'मधील ट्विंकल सरानाची भूमिका साकारत होती. ती या भूमिकेत खुश नव्हती अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र जास्मीनने शेवट पर्यंत या मालिकेत काम केलं. (Photo-Official Instagram)
-
विवियन डिसेनाला 'मधुबाला-एक इश्क एक जुनून'या मालिकेत रिप्लेस करण्यात आलं होतं. त्याची भूमिका त्याला पटणारी नव्हती म्हणून त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फॅन्सच्या विनंतीमुळे विवियनला मालिकेत परत बोलावण्यात आले.(Photo-Official Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख