-
बॉलिवूडमधील लव्ह बर्ड आलिया भट आणि रणबीर कपूर त्यांच्या अफेअरमुळे कायमच चर्चेत असतात..(File Photo)
-
रणबीर कपूर सध्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी दिल्लीला गेल्याने आलिया रणबीरला चांगलचं मिस करतेय आणि म्हणूनच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही सेल्फी शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. .(File Photo)
-
आलिया भटने इन्स्टाग्रामवर कॅप घातलेले दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने बॉयफ्रेण्ड रणबीरसाठी एक खास कॅप्शन लिहिलं आहे. विशेष म्हणजे आलियाने या फोटोत जी कॅप घातल्याचं दिसतंय. ती रणबीर कपूरची असून आलियाने ही कॅप चोरल्याची स्वत: कबुली दिली आहे. (Photo-instagram@ aliaabhatt)
-
फोटोच्या कॅप्शनमध्ये आलिया म्हणाली, "जेव्हा तुम्ही त्याला मिस करता तुम्ही त्याच्या वस्तू चोरू शकता. (आणि हो भरपूर सेल्फी काढायला विसरू नका)" असं म्हणत आलियाने एक प्रकारे तिने रणबीरची कॅप चोरी केल्याचं मान्य केलंय. (Photo-instagram@ aliaabhatt)
-
या आधी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने रणबीर कपूरला स्पॉट केलेल्या फोटोत त्याने हीच कॅप घातल्याचं दिसतंय. (Photo-instagram@Viral bhayani)
-
तर आलिया भट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत.(File Photo)

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं