-
काही दिवसांपूर्वी भारताने कारगिल युद्ध जिंकायला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यांच्या आयुष्यावर आधारीत 'शेरशाह' हा चित्रपट आज १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणी देखील दाखवण्यात आली आहे.
'शेरशाहर' या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने साकारली आहे. तर अभिनेत्री कियारा आडवाणीने विक्रम बत्राच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. 'क्विंट'ने साधारण दोन वर्षांपूर्वी बत्रा यांच्या प्रेयसीची मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी विक्रम बत्रा आणि त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. -
डिंपल छीमा असं विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव. १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती.
-
एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. अर्थात या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं नाही. आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व नियतीचाच खेळ होता, असं डिंपल म्हणाल्या होत्या.
विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर काही काळातच बत्रा यांना देहरादून येथे असणाऱ्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला होता. तेव्हापर्यंत डिंपल आणि त्यांच्यात प्रेमाचा बहर आलाच होता. हे दोघं एकमेकांपासून दूर असूनही त्यांच्या मनात मात्र तेच होते. -
जसे दिवस जात होते तशी दोघांच्याही कुटुंबियांकडून लग्नाची विचारणा होऊ लागली होती. मुळात आपण एकमेकांसाठीच या जगात आलो आहोत, हे विक्रम आणि डिंपल जाणून होते.
-
एके दिवशी मनसा देवी आणि श्री नाडा साहेब गुरुद्वारा येथे भेट दिली असता परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर विक्रम बत्रा हे अचानक डिंपल यांना म्हणाले, 'अभिनंदन मिसेस बत्रा, आपण दोघांनी सोबतीने चार फेरे मारले, तुमच्या लक्षात आलं नाही'
त्याचवेळी डिंपल यांच्या लक्षात आलं की पूर्णवेळ विक्रम त्यांच्या ओढणीचं टोक पकडून होते. कुटुंबियांकडून वारंवार होणाऱ्या लग्नाच्या विचारणेमुळे एक दिवस डिंपल यांनी विक्रम बत्रांना लग्नाबद्दल विचारलं होतं. विक्रम बत्रा यांनी आपल्या पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला. यानंतर आपल्या अंगठ्याने त्यांनी डिंपल यांची भांग रक्ताने भरली. हा जीवनातील सर्वात अनमोल क्षण होता, असं डिंपल यांनी सांगितलं. -
कुंकवाच्या जागी, रक्ताने डिंपल यांच्या कपाळावर विक्रम यांनी त्यांच आयुष्य एकमेकांशी जोडून घेतलं होतं.
-
या साऱ्यामध्येच कारगिल युद्धाची घोषणा झाली आणि बत्रा यांना बोलवण्यात आलं. डिंपल विक्रम बत्रा यांची वाट पाहत राहिल्या. ते शहीद झाल्यानंतरही त्यांच्या प्रतीक्षेत त्या आहेत.
-
एका सैनिकाच्या प्रेमकहाणीचा हा अंत असला तरीही डिंपल यांनी आपल्या प्रेमाचा कायम अभिमान बाळगला. पुढे कधीच लग्न न करण्याचा निर्णय डिंपल यांनी घेतला.
-
डिंपल यांनी कॅप्टन बत्रायांच्या नावावर स्वत: च आयुष्य केलं आणि पुन्हा एकदा प्रेम कायमच अमर असतं हे सिद्ध करुन दाखवलं.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन