-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाने ९० च्या दशकामध्ये सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या ठुमक्यांनी तर अनेकांना नाचण्यास भाग पाडलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
शिल्पाचं नाव बॉलिवूडमधील त्यावेळेचा आणि आताही दमदार भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारशी जोडलं गेलं.
-
मात्र चित्रपटसृष्टींमधील चर्चांनुसार या प्रकरणानंतर शिल्पाचा असा प्रेमभंग झाला की तिने त्यानंतर आपल्या करियरवरच लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.
-
अक्षय कुमारबरोबर नाव जोडलं गेल्यानंतर काही वर्षांनी मात्र लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री २००९ मध्ये लग्न करत असल्याची घोषणा केली.
-
शिल्पाने कोणत्याही कलाकाराशी लग्न न करता एका उद्योजकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि राज कुंद्रा यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं.
-
२२ नोव्हेंबर २००९ रोजी शिल्पा राज कुंद्रांबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
मध्यंतरी अक्षय आणि राज हे दोघे एका व्यवसायामध्ये बिझनेस पार्टनरही होते.
-
भारतीय वंशाचा मात्र ब्रिटीश नागरिक असणाऱ्या राज कुंद्रांशी शिल्पाने लग्न केलं. राज कुंद्रा यांचं त्यावेळी सिनेसृष्टीशी काही घेणदेण नव्हतं.
-
मात्र राज कुंद्रा यांचं शिल्पाशी लग्न करण्याआधीच एक लग्न झालेलं. त्यामुळेच आपल्या आधीच्या पत्नीला म्हणजेच कविताला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी शिल्पाशी लग्न केलं.
-
शिल्पा आणि राज यांचं लग्न हे बिग फॅट इंडियन वेडिंग प्रकारात मोडणारं फार महागडं असं लग्न ठरलं.
-
लग्नात शिल्पा आणि राज यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
-
२२ नोव्हेंबर २००९ रोजी शिल्पा आणि राज खंडाळ्यामध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
-
याशिवाय शिल्पा आणि राज यांनी लग्नात अनेक लहान मोठ्या गोष्टींवर कोट्यावधी रुपये खर्च केले.
-
शिल्पा आणि राज कुंद्रा यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती.
-
राज कुंद्रांनी शिल्पा शेट्टीला तिच्या फरफ्युम ब्रॅण्डच्या प्रमोशसाठी मदत केलेली.
-
शिल्पाला पाहिल्या क्षणीच राज कुंद्रा तिच्या प्रेमात पडले होते. नंतर शिल्पाही हळूहळू राज कुंद्रा यांच्या प्रेमात पडली.
-
सुरुवातील शिल्पाने चित्रपट सृष्टीमधील करियरचं कसं होणार या कारणामुळे लग्नाबद्दल संभ्रमात होती. मात्र तिने राज कुंद्रा यांनी तिची समजूत घातल्यानंतर तिने लग्नाला होकार दिला.
-
२०१३ साली फिल्मफेअरला राज कुंद्रा यांनी मुलगा विहानच्या जन्मानंतर मुलाखत दिलेली. त्यावेळी त्यांनी शिल्पासोबतच्या लग्नाबद्दल भाष्य करताना आपण हिच्याशी लग्न करणार असं मला फार आधीपासून वाटत असल्याचं म्हटलं होतं.
-
“नजराजनर होऊन प्रेमात पडण्यापेक्षाही तिच्यामध्ये आणखीन काहीतरी मला फार भावलं होतं. ती मला एखाद्या परीप्रमाणे वाटायची. जशी माझ्याशी तिची ओळख वाढली तशी ती मला अधिक चांगली वाटू लागली. एक अभिनेत्री असल्याने ती मद्यप्राशन करत असेल किंवा धुम्रपान करत असेल असं अनेकांना वाटत असणार. मात्र ती यापैकी काहीही करत नाही", असं राज कुंद्रा म्हणाले होते.
-
"मी तिला माझ्या आई-वडिलांशी भेट घालून देण्यासाठी माझ्या घरी घेऊन गेलेलो. तिथेही ती फार उत्साही दिसली. ती त्यांच्या पायही पडली. मला तिच्या या कृतीचा आदर वाटतो. ती जेव्हा माझ्या पालकांच्या पाया पडली तेव्हाच मला ही मुलगी माझी पत्नी होऊ शकते, असं वाटलं,” अशी माहिती राज कुंद्रांनी मुलाखतीमध्ये दिली होती.
-
शिल्पासोबत पहिल्यांदा झालेल्या भेटीबद्दलही कुंद्रा या मुलाखतीमध्ये बोलले होते. शिल्पाला पाहता क्षणी आपण तिच्या प्रेमात पडल्याचं राज कुंद्रांनी सांगितलं होतं.
-
“मी जेव्हा हॉटेलमध्ये तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती तिच्या आईसोबत बसली होती. तेव्हाच मला ती फार आवडली होती. ती संस्कारी आणि चांगल्या विचारांची असल्याचं लगेच जाणवलं. मी पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. मी तिला पाहिल्या पाहिल्याच मला आयुष्याची जोडीदार म्हणून हिची सोबत आवडेल हे जाणवलं,” असं राज मुलाखतीत म्हणाले होते.
-
हे दोघेही सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. यीमध्ये अगदी त्यांच्या घरापासून ते भटकंतीसंदर्भातील फोटोंचाही समावेश असतो.
-
कुंद्रा यांच्या अटकेनंतर त्यांच्यासोबतच शिल्पा शेट्टीसंदर्भातही वृत्तपत्रांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच चर्चा सुरु असल्याचं दिसतय. त्यांची संपत्ती, घर यासंदर्भातही बरीच चर्चा होताना दिसतेय. यामध्ये राज यांच्या घरांबद्दलही चर्चा होताना दिसतेय.
-
कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीच्या घराप्रमाणेच मुंबईमधील हे घरही अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे.
-
त्याचबरोबर कुंद्रा यांनी दुबईमध्येही एक आलीशान बंगला घेतलाय. या बंगल्यामध्येही अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. पाहुयात याच बंगल्याचे काही खास फोटो
-
दुबईजवळच्या एका बेटावर शिल्पा आणि राज यांनी हे व्हेकेशन होम घेतलं आहे.
-
शिल्पा आणि राज या दोघांनाही महागड्या लाइफस्टाइलची सवय आहे. राज कुंद्राही अनेकदा पत्नीच्या इच्छेप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात असं त्यांनी मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याच अलिशान गोष्टींमध्ये दुबईतील या घराचाही समावेश होतो.
-
या घरामध्ये खासगी जीम, स्विमिंग पूल, गार्डन एरिया आणि इतर सुविधा आहेत. शिल्पा अनेकदा या घराचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करताना दिसते.
-
शिल्पा आणि राज यांच्या लग्नाना २०१० मध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज यांनी जगातील सर्वात उंच इमारत असणाऱ्या बुर्ज खलीफामध्ये एक आलीशान प्लॅट आपल्या पत्नीला गिफ्ट केला.
-
बुर्ज खलीफामधील या फ्लॅटची किंमत ५० कोटी रुपये इतकी होती असं सांगण्यात येतं. मात्र हा फ्लॅट अजूनही शिल्पाकडे आहे की नाही याची माहिती उपलब्ध नाही. २०१५ मध्ये हा फ्लॅट विकल्याची माहिती समोर आलेली मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.
-
दुबईमधील सर्वात महागड्या ठिकाणी शिल्पा आणि राज यांचा हा बंगला आहे. पाम जुमेराह परिसरामध्ये हा बंगला आहे. अनेकदा शिल्पा आणि राज सुट्ट्यांमध्ये या बंगल्यावर वास्तव्यासाठी येतात. हा दुबईमधील सुट्ट्यांदरम्यान शिल्पाने पोस्ट केलेला त्यांच्या बंगल्यातील फोटो आहे.
-
दुबईबरोबरच शिल्पाला लंडनमध्ये रहायलाही फार आवडतं. शिल्पासाठी राज कुंद्रांनी लंडनमध्येही एक घर विकत घेतलं आहे. या फ्लॅटची किंमत ७ कोटी रुपये इतकी असल्याचे समजते.
-
शिल्पा शेट्टीच्या नावे मुंबईमध्ये दोन मोठे रेस्तराँ सुद्धा आहेत. यामधून त्यांची वर्षाला कोट्यावधीची कमाई होत असल्याचं सांगितलं जातं.
-
नुकताच शिल्पा आणि राज यांनी मुंबईतील वरळीमध्ये बॅस्टीयन चैन नावाचं एक रेस्तराँ सुरु केलं आहे. याचे फोटोही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले.
-
दुबईमधील बंगल्यामध्ये एक मोठा बार एरिया आणि स्विमिंग पूल आहे. या फोटोकडे पाहिल्यानंतर हा बंगला किती भव्य आणि आलिशान आहे याचा अंदाज बांधता येतो.
-
विशेष म्हणजे हा बंगला समुद्र किनाऱ्यावर आहे.
-
म्हणजे या बंगल्याच्या लॉनमधून थेट समुद्रकिनाऱ्यावर जाता येतं.
-
राज आणि शिल्पा यांचा जुहूमधील बंगलाही दुबईच्या बंगल्याइतकाच आलीशान आहे.
-
शिल्पा बऱ्याच वेळा योगाचे व्हिडीओ बंगल्यामधील गार्डनमध्येच शूट करते.
-
योग करण्यासाठी शिल्पा आणि राजच्या मुंबईतील बंगल्यात एक खास जागा आहे.
-
शिल्पाने मुंबईतील घराच्या गार्डनमध्ये भाज्या लावल्या आहेत.
-
त्याच्या मुंबईतील घरात जीम, मोठे गार्डन, थिएटर असल्याचे दिसत आहे.
-
मात्र त्याचवेळी निवांतपणा असावा म्हणून घराला जिथे जिथे शक्य आहे तिथे पॅनरोमा व्ह्यू असणाऱ्या बाल्कनीही आहेत.
-
शिल्पा आणि राज यांच्या घराबरोबरच त्यांच्या लग्नासंदर्भातही अनेकजण सध्या इंटरनेटवर माहिती शोधताना दिसतायत. तर त्यांच्या या बीग फॅट वेडिंगमध्ये किती खर्च झालेला आणि काय काय घडलेलं त्याबद्दल जाणून घेऊयात.
-
शिल्पासोबत लग्न करण्यासाठी राज यांनी अगदी शिल्पाच्या आईलाही आपल्या बाजूने करुन घेण्याचे प्रयत्न केले. शिल्पाच्या आईवर छाप पाडण्यासाठी राज यांनी अनेकदा शिल्पाच्या घरी भेटवस्तू पाठवल्याचं पेज थ्रीवर छापून आलं होतं. तसेच काही सिने मॅगझिन्सनेही यासंदर्भातील लेख छापले होते.
-
२००९ साली या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं आणि नोव्हेंबरमध्येच या दोघांनी साखरपुडा केला. यावेळी राज कुंद्रांनी शिल्पाला कोट्यावधीची एन्गेजमेंट रिंग दिलेली.
-
राज यांनी साखरपुड्याला शिल्पाला घातलेल्या अंगठीमध्ये २० कॅरेटचा हिरा होता. या अंगठीची किंमत ३ कोटी रुपये इतकी होती.
-
प्रसारमाध्यमांपासून दूर कुठेतरी आपल्या लोकांसोबत निवांतपणे लग्नसमारंभ आयोजित करण्याच्या दृष्टीने या दोघांनी मुंबईमधील महागड्या हॉटेलऐवजी खंडाळ्यामध्ये लग्न केलं.
-
प्रसारमाध्यमांना शिल्पाच्या लग्नाची बातमी कळताच तिच्या लग्नाच्या कव्हरेजसाठी अनेक पत्रकारांनी खंडळ्यात लग्नसोहळा सुरु असणाऱ्या हॉलबाहेर गर्दी केली होती. आतील दृष्य टीपण्यासाठी काही पत्रकार तर झाडावरही चढलेले.
-
अखेर शिल्पा आणि राज यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांना फोटो तसेच व्हिडीओंसाठी पोजही दिल्या.
-
यावेळी शिल्पाने दाक्षिणात्य पद्धतीचा पेहराव केलेला. डोक्यामध्ये छान गजराही घातला होता.
-
शिल्पाने तिच्या लग्नामध्ये ३ कोटी रुपयांचे दागिने अंगावर घातलेले.
-
शिल्पाने लग्नामध्ये घातलेला लेहंगाच ५० लाखांचा होता.
-
राज यांना अटक झाल्यापासून त्यांच्या संपत्तीबरोबरच खासगी आयुष्यासंदर्भातही जास्तीत जास्त माहिती इंटरनेटवर सर्च केलं जात आहे.
-
त्यामुळेच शिल्पा आणि राज यांच्या लग्नाबद्दलही सर्चचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे. (सर्व फोटो : ट्विटर, इन्स्टाग्राम, पीटीआय, रॉयटर्स, एपी आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं