-
अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये तिचा जम बसवत आहे. आज कियाराचा २९वा वाढदिवस आहे. कियाराचे वडिल एक बिझनेसमन असून आई शिक्षिका आहे.
-
कियाराने एम.एस.धोनी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊलं टाकलं असं अनेकांना वाटतं असलं तरी 'एम एस धोनी' हा कियाराचा पहिला सिनेमा नाही. कियाराने २०१४ सालामध्ये आलेल्या 'फगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
-
अनेकांना कदाचित कल्पना नसेल मात्र कियाराचं खरं नावं हे 'आलिया' आहे. 'फगली' या सिनेमानंतर कियाराने तिचं नाव बदलंल. आणि आलियाची ती कियारा झाली.
-
कियाराच्या बॉलिवूड पदार्पणाआधीच अभिनेत्री आलिया भट्टची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कियाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला. सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचं नाव बदललं होतं.
-
एका मुलाखतीत कियाराने तिने 'कियारा' हे नाव का निवडलं याचा खुलासा केला होता. 'अंजाना अंजानी' या सिनेमात प्रियांया चोप्राच्या भूमिकेचं नाव कियारा आहे. हे नाव कियाराला खूप आवडलं होतं आणि तिने कियारा हे नाव निवडलं.
-
कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आजह तिचं आलिया हे नाव पाहायला मिळतं. कियाराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कियारा आलिया आडवाणी' असं नाव आहे.
-
. 'कबीर सिंह' या सिनेमामुळे कियाराला मोठी प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातील तिचं 'प्रिती' हे पात्र चांगलचं गाजलं.
-
कियारा लवकरच 'भुल भुलैया', 'शेरशाह' आणि 'जुग जुग जीयो' या सिनेमांमधून झळकणार आहे.
-
तर कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशहा' सिनेमा लवरकच प्रदर्शित होणार असून चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत.
-
'शेरशहा' सिनेमासोबतच कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अनेकदा कियारा आणि सिद्धार्थला स्पॉट करण्यात आलंय.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख