-
आपण जेव्हा कपाटा समोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात हाचं विचार येतो की आज आपण कोणता ड्रेस घालावा ? काय करावं ? आपण नेहमीचं आज माझ्याकडे कपडेच नाहीत ? असा नारा लावलेत असतो. चला तर मग बघुयात बॉलीवूडमधील काही अभिनेत्रीं ज्यांनी अल्टिमेट फॅशन गोलं सेट केले आहेत. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नेहमीच फॅशन गोलस् देत असते. तिचा काळ्या रंगाचा क्रॉसएट गाऊन तिच्यावर अप्रतिम शोभत आहे. (Photo-Official Instagram) सारा अली खान इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत होती. (Photo-Official Instagram) -
अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच छान छान ड्रेस परिधान करताना दिसते. यावेळे तिचा निळ्या रंगाचा स्वेटर जॅकेट , निळ्या रंगाची पॅन्ट आणि अनोखा अंदाज पाहुन तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. (Photo-Official Instagram)
अभिनेत्री मलायका अरोराने पांढऱ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट परिधान केली आहे. (Photo-Official Instagram) अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये पती सोबत एंजॉय करताना दिसत आहे. तिने शेअर केलेला कॅज्युअल अंदाजातला हा फोटो पाहुन तुम्ही पण म्हणाल कपडे परिधान करावे तर असे. अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाच जॅकेट परिधान केलेल असून त्या शर्टाला साजेसा निळ्या रंगाची डेनिम परिधान केली आहे. (Photo-Official Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख