-
अभिनेत्री आणि व्हिडिओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर लवकरच आई होणार आहे.
-
उर्मिला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपसहीत फोटो पोस्ट करत आहे. उर्मिला ही सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून ती या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिला सुकीर्त गुमस्तेसोबत लग्नबंधनात अडकली. याच वर्षी एक एप्रिल रोजी तिने आपल्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करत आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती.
-
उर्मिलाचे डोहाळे जेवण पार पडले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
उर्मिलाने तिच्या कुटुंबासोबत करोनाचे सगळ्या निर्बंधांचे पालन करत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे.
-
पुण्यातील 'ढेपे वाडा' या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला आहे.
-
उर्मिला सध्या गरोदरपणातील प्रत्येक दिवसाचा आनंद घेताना दिसतेय.
-
उर्मिलावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
उर्मिलाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
'दुहेरी' ही तिची मालिका विशेष गाजली होती. तिने 'दिया और बाती हम', 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला निंबाळकर / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल