बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणात शिल्पा देखील असू शकते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. शिल्पाने राज कुंद्राच्या विहान या कंपनीला काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. फक्त राज कुंद्राच्या कंपनीत नाही तर शिल्पाने स्वत: सुद्धा गुंतवणूक केली आहे. शिल्पा शेट्टीचे मुंबईत एक रेस्टॉरंट आहे. शिल्पा आणि राजने मुंबईतील वांद्रे परिसरात गेल्या वर्षी एक रेस्टॉरंट सुरु केलं. 'बॅस्टियान' असं या त्यांच्या रेस्टॉरंटचे नाव आहे. -
शिल्पानं आपल्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
या उद्घाटनात बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. -
शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये पांढऱ्या आणि भूरकट रंगाचे फर्निचर आहे.
येत्या काळात या रेस्टॉरंटचे अनेक फ्रेंनचायझी संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये असलेलं आलिशान झुमर पासून टेबल पर्यंत या सगळ्यागोष्टी येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधते. शिल्पाच्या रेस्टॉरंटमध्ये असलेली प्रत्येक वस्तू ही अप्रतिम आहे. शिल्पा शेट्टी या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच तिच्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत येताना दिसते. -
या फोटो शिल्पा, राज, जिनेलिया आणि रितेश देशमुखसोबत दिसतं आहे.
-
शिल्पाचे हे रेस्टॉरंट ८००० सक्वेअर फूट एवढेचे आहे.
२०१९ मध्ये शिल्पाने या रेस्टॉरंटचा ५० टक्के हिस्सा विकत घेतला. २०१९ मध्ये 'इकनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने या रेस्टॉरंटमध्ये १० ते १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. -
त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये शिल्पाने वरळीत बॅस्टियन या रेस्टॉरंटची फ्रेंनचायझी सुरु केली. (Photo Credit : Shilpa Shetty Instagram and Bastian Facbook)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ